Ind vs NZ 1st Test : पहिल्या डावात भारताची त्रिशतकी मजल, मुंबईकर श्रेयस अय्यर चमकला
न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३४५ धावांपर्यंत मजल मारली आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरचं शतक आणि त्याला शुबमन गिल, रविंद्र जाडेजाने दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयसने या सामन्यात १०५ धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाअखेरीस भारताने ४ विकेट गमावत २५८ धावांपर्यंत मजल मारली […]
ADVERTISEMENT
न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३४५ धावांपर्यंत मजल मारली आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरचं शतक आणि त्याला शुबमन गिल, रविंद्र जाडेजाने दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयसने या सामन्यात १०५ धावांची खेळी केली.
ADVERTISEMENT
पहिल्या दिवसाअखेरीस भारताने ४ विकेट गमावत २५८ धावांपर्यंत मजल मारली होती. ४ बाद १४५ अशा विचीत्र अवस्थेत अडकलेल्या टीम इंडियाला श्रेयस अय्यर आणि रविंद्र जाडेजाच्या शतकी भागीदारीने वाचवलं. पहिल्या दिवसाअखेरीस श्रेयस अय्यर ७५ तर रविंद्र जाडेजा ५० धावांवर नाबाद होता. परंतू दुसऱ्या दिवसाच्या खेळात टीम साऊदीने भारताला एका मागोमाग एक धक्के देण्यास सुरुवात केली.
Ind vs NZ Test : …आणि श्रेयसने बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, पदार्पणाच्या कसोटीत खडूस शतकी खेळी
हे वाचलं का?
अर्धशतक झळकावलेल्या रविंद्र जाडेजाला क्लिन बोल्ड करत साऊदीने भारताला दुसऱ्या दिवसात पहिला धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यरने वृद्धीमान साहाच्या साथीने काही सुरेख फटके खेळत आपलं पहिलं-वहिलं शतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याचा बहुमान यावेळी श्रेयस अय्यरने पटकावला. परंतू दुसऱ्या बाजूने साऊदीने टीम इंडियाला डावाला खिंडार पाडलं.
Shreyas Iyer: जे सचिनलाही जमलं नाही ते श्रेयसने करुन दाखवलं, पदार्पणातच ‘यांनी’ झळकावलंय कसोटी शतक!
ADVERTISEMENT
वृद्धीमान साहा, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर यांना ठराविक अंतराने आपल्या जाळ्यात अडकवत साऊदीने टीम इंडीया मोठी धावसंख्या उभारणार नाही याची काळजी घेतली. लंच सेशनपर्यंत भारताने ८ विकेट गमावल्या होत्या. रविचंद्रन आश्विनने तोपर्यंत संघाचा किल्ला चांगला लढवला. दुसऱ्या सेशनमध्ये आश्विन आणि इशांत शर्माला आऊट करत टीम इंडियाचा डाव संपवला. न्यूझीलंडकडून साऊदीने ५, जेमिन्सनने ३ तर पटेलने २ विकेट घेतल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT