Ind vs NZ : टीम इंडियाची मालिकेत विजयी आघाडी, रोहित-राहुलची निर्णायक शतकी भागीदारी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिल्याच मालिकेत विजयी आघाडी घेऊन चांगली सुरुवात केली आहे. रांचीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट राखून मात केली आहे. १५४ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्माने केलेली शतकी भागीदारी निर्णायक ठरली. टॉस जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. […]
ADVERTISEMENT
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिल्याच मालिकेत विजयी आघाडी घेऊन चांगली सुरुवात केली आहे. रांचीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट राखून मात केली आहे. १५४ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्माने केलेली शतकी भागीदारी निर्णायक ठरली.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि डॅरेल मिचेल यांनी चांगली सुरुवात केली. गप्टील आणि मिचेल या दोन्ही बॅट्समननी पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये चांगली फटकेबाजी करुन चांगल्या धावा जमवल्या. ही जोडी भारतीय बॉलर्सना हैराण करणार असं वाटत असतानाच दीपक चहरने मार्टीन गप्टीलला आऊट केलं. यानंतर मार्क चॅम्पमनने डॅरेल मिचेलच्या साथीने पुन्हा एकदा छोटेखानी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला.
Ind vs NZ Test : वानखेडे मैदानावर प्रेक्षकांना १०० टक्के एन्ट्री, राज्य सरकारची परवानगी
हे वाचलं का?
अक्षर पटेलने चॅम्पमनला आऊट करत न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीने निराशा केली. मोक्याच्या क्षणी भागीदारी करण्यात न्यूझीलंडचे फलंदाज अपयशी ठरले. भारतीय बॉलर्सनी मधल्या ओव्हर्समध्ये टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घातली. त्यामुळे निर्धारित षटकांत न्यूझीलंडचा संघ ६ विकेट गमावून १५३ पर्यंत मजल मारु शकला. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या हर्षल पटेलने २ तर आश्विन, पटेल, चहर आणि भुवनेश्वर यांनी १-१ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या ओव्हरपासून आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंड बॉलर्सवर हल्लाबोल केला. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी करुन न्यूझीलंडच्या आव्हानातली हवा काढून घेतली. लोकेश राहुलने विशेषकरुन आक्रमक पवित्रा घेत चौफेर फटकेबाजी केली. भारताची ही जोडी संघाला मोठा विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच टीम साऊदीने लोकेश राहुलला माघारी धाडलं. लोकेश राहुलने ४९ बॉलमध्ये ६ चौकार आणि २ षटकार लगावत ६५ रन्स केल्या.
ADVERTISEMENT
ICC Tournaments: Pakistan मध्ये तब्बल 3 दशकानंतर ICC इव्हेंट, भारतात कधी असणार पुढचा वर्ल्डकप?
ADVERTISEMENT
यानंतर व्यंकटेश अय्यर आणि रोहित शर्मा जोडीने फटकेबाजी करुन संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतू रोहित शर्मा साऊदीच्या बॉलिंगवर फसला, ५५ धावा करुन रोहित शर्माने गप्टीलच्या हातात कॅच दिला. रोहितने आपल्या अर्धशतकी खेळीत १ चौकार आणि ५ षटकार लगावले. हा धक्का कमी होता म्हणून की काय साऊदीने त्याच षटकात सूर्यकुमार यादवलाही स्वस्तात माघारी पाठवलं. यानंतर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंतने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT