Virat-Rohit : भरमैदानात कोहली-रोहितमध्ये खडाजंगी, व्हिडीओ व्हायरल
न्यूझीलंडची धावसंख्या 19 पर्यंत जात होती तोच त्यांनी दोन विकेटही घेतल्या होत्या. त्याच सामन्यात 9 व्या षटकात दुसरी विकेट मिळाल्यानंतर टीम इंडिया एका विकेटसाठी मात्र त्यावेळी हतबल झालेली दिसून येत होती.
ADVERTISEMENT

Virat-Rohit : भारतीय क्रिकटे संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अनेकदा भारताच्या सामन्यावेळी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अनेक सूचना देत असतो. हे आता सर्वपरिचित आहे. भारताकडून एकदा न्यूझीलंडमध्ये 19 धावांमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर टाकले होते. तर त्याचवेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. कोहली आपलं मत सांगण्यासाठी तिथे गेला होता. मात्र तिथे रोहितनेही आपलं मत व्यक्त केले. त्यानंतर मात्र कोहली सामन्यावेळी आपल्या फिल्डिंगला निघून गेला. तोच व्हिडीओ आता आयसीसीकडून पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओ व्हायरल
सामन्यावेळी भारतीय संघाचे 31 वे षटक संपले होते. त्यावेळी विराट कोहली धावत धावत रोहित शर्माकडे गेला होता. त्यावेळी तो अतिशय गंभीरपणे मत मांडताना दिसत होता. त्यावेळी रोहितने आधी त्याचे म्हणणे आधी ऐकून घेतले आणि त्याकडे नंतर दुर्लक्ष केले. पण त्यानंतर त्यानेही कोहलीसमोर आपले मत व्यक्त केले होते. त्यावर कोहली अगदी शांत शांत दिसला होता. मात्र तो क्षेत्ररक्षणासाठीही निघून जाताना दिसून आला. या घटनेचाही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा >> Dalip Tahil Case : एक चूक अन् अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा, 2018 चं प्रकरण काय?
Captain Rohit Sharma ignoring Virat Kohli’s fluke opinion on the field.
Take this crown my king ! @ImRo45 👑pic.twitter.com/jnk5xvwEl8
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 𝕏 (@ImHydro45) October 22, 2023