भारत-पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर्समध्ये जुंपली, ट्विटरच्या माध्यमातून रंगलं वाकयुद्ध
आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे आणि त्यात अजून एक आठवडा बाकी आहे. पण दोन्ही संघांचे चाहते आणि माजी खेळाडू आधीच आमने-सामने आल्यानं 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामन्यासाठी वातावरण तयार होऊ लागले आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी जेव्हा आशिया कपमधून बाहेर पडला तेव्हा माजी क्रिकेटपटू वकार युनूसने ही टीम […]
ADVERTISEMENT

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे आणि त्यात अजून एक आठवडा बाकी आहे. पण दोन्ही संघांचे चाहते आणि माजी खेळाडू आधीच आमने-सामने आल्यानं 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामन्यासाठी वातावरण तयार होऊ लागले आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी जेव्हा आशिया कपमधून बाहेर पडला तेव्हा माजी क्रिकेटपटू वकार युनूसने ही टीम इंडियासाठी दिलासादायक गोष्ट असल्याचे म्हटले होते. आता भारताच्या इरफान पठाणने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज इरफान पठाणने रविवारी एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने लिहिले की, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यावेळी आशिया कप खेळत नाहीत ही इतर संघांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इरफानचे हे ट्विट वेगाने व्हायरल झाले. टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरनेही याचा आनंद घेतला आणि एक मीम ट्विट केला आणि लिहिले की, तुम्ही काहीही बोलू नका, पण मी ऐकले. या दोघांच्या या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांची चांगलीच खळबळ उडाली आणि पाकिस्तानी संघाला ट्रोल केले.
खरं तर, जेव्हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आशिया चषक 2022 मधून बाहेर पडल्याची बातमी आली तेव्हा पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसने एक ट्विट केले, त्यानंतर तो भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. वकार युनूसने लिहिले की, शाहीन आफ्रिदी खेळत नाही ही टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरसाठी दिलासादायक बाब आहे.
विश्वचषक 2021 मध्ये जेव्हा भारताचा पाकिस्तानशी सामना झाला तेव्हा शाहीन आफ्रिदीनेच केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या विकेट घेत टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडले होते. भारताने हा सामना 10 विकेटने गमावला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, परंतु यावेळी दोन्ही संघांकडे त्यांचे प्रमुख वेगवान गोलंदाज नाहीत. जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी हे दोघेही दुखापतीमुळे या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (WK), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (WK), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर
पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.