BCCI: रोहित-विराटचं टी20 करिअर धोक्यात? आगरकरांच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

ind vs wi rohit sharma virat kohli t20 career the end bcci chief selector ajit agarkar
ind vs wi rohit sharma virat kohli t20 career the end bcci chief selector ajit agarkar
social share
google news

Rohit Sharma- Virat Kohli T20 Feature : बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी हार्दीक पंड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद,तर उप कर्णधारपद सुर्यकुमार यादवकडे (Surykumar yadav) दिल्याची घोषणा केली आहे. या घोषणेसह आगरकर यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) संघातून ड्रॉप केले आहे. त्यामुळे आता रोहित आणि विराटचे टी20 करिअर संपुष्ठात आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबतच अजित आगरकरच्या निवडीवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. (ind vs wi rohit sharma virat kohli t20 career the end bcci chief selector ajit agarkar)

अजित आगरकर यांनी 2024 साली होणाऱ्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रीत करत संघ निवडीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून वेस्टइंडीज दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. तर दिग्गग खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. वेस्टइंडीज दौऱ्यासाठी हार्दीक पड्याला कर्णधारपद देण्यात आले आहे. तर उपकर्णधार पदाची जबाबदारी सुर्यकुमार यादवच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या खेळाडूंसह संघात यशस्वी जायस्वाल, तिलक वर्मा आणि मुकेश कुमार सारख्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंसह संजू सॅमसनची संघात वापसी झाली आहे.

हे ही वाचा : ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना ‘या’ दिवशी

न्युझीलंड विरूद्ध जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालेल्या सामन्यात राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, पृथ्वी शॉ, जितेश शर्मा, वॉशिग्टन सुंदर, शिवम मावी सारखे खेळाडू होते. या सर्व खेळाडू संघातून बाहेर झाले आहेत. पृथ्वी शॉ आणि जितेश शर्माला या सीरीजमध्ये संधी मिळाली नव्हती.तर राहुल त्रिपाठी आणि दीपक हुड्डा फ्लॉप ठरला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली 2022 ला टी20 वर्ल्ड कप खेळताना दिसले होते. या स्पर्धेनंतर एकही स्पर्धेत दोघेही खेळताना दिसले नव्हते. त्यात आता नवीन खेळाडूंना संघात संधी देण्याचा विचार बीसीसीआय करते आहे. अशातच रोहित-विराट सारख्या दिग्गद खेळाडूंचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रिंकू सिंह आणि ऋतुराज गायकवाडला डावललं

यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक असे तरूण खेळाडू होते, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळीने टीम इंडियाचा संघात जागा मिळवण्याचा दावा केला होता. यामध्ये रिंकू सिंह आणि ऋतुराज गायकवाड यांसारख्या खेळाडूंचे प्रामुख्याने नाव आहे. रिंकू सिंहने तर 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकून सामना जिंकवला होता. आयपीएल 2023 मध्ये त्याने 149.53 स्ट्राईक रेटने 474 धावा ठोकल्या होत्या. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडची देखील आयपीएलमध्ये बॅट तळपली होती. गायकवाडने आयपीएल 2023 मध्ये 590 धावा केल्या होत्या. चेन्नईला पाचव्यांचा चॅम्पियन बनवण्यात ऋतुराज गायकवाडचा मोठा वाटा आहे. आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सुद्धा या खेळाडूंची निवड झाली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान रोहित शर्मा, विराट कोहली या दिग्गज खेळाडूंसह रिंकू सिंह आणि ऋतुराज गायकवाड सारख्या खेळाडूंची संघात निवड न झाल्याने क्रिकेट फॅन्स नाराजी व्यक्त करत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  ”विराट कोहलीवर जळतो गौतम गंभीर म्हणून…’, ‘त्या’ वादावर क्रिकेटरचं मोठं विधान

टी20 संघ : ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सुर्य कुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दीक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नाई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

वेस्ट इंडिज दौरा : टीम इंडियाचे वेळापत्रक

पहिला सामना – 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
दुसरा सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

पहिला एकदिवसीय – 27 जुलै, ब्रिजटाऊन
दुसरी वनडे – 29 जुलै, ब्रिजटाऊन
तिसरी एकदिवसीय – 15 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

1ली T20 – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
2रा T20 – 6 ऑगस्ट, गयाना
तिसरा T20 – 8 ऑगस्ट, गयाना
चौथा T20 – 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा T20 – 13 ऑगस्ट, फ्लोरिडा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT