Ind vs Eng : तब्बल ५० वर्षांनी टीम इंडियाने ओव्हलचं मैदान मारलं, इंग्लंडवर १५७ धावांनी मात
तब्बल ५० वर्षांनी टीम इंडियाला इंग्लंडमध्ये ओव्हलचं मैदान मारण्यात यश आलेलं आहे. कसोटीच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांवर संपवत १५७ रन्सनी बाजी मारली. १९७१ साली भारताने ओव्हलच्या मैदानावर आपला पहिला आणि शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. यानंतर तब्बल ५० वर्षांनी ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आलंय. १९७१ नंतर […]
ADVERTISEMENT

तब्बल ५० वर्षांनी टीम इंडियाला इंग्लंडमध्ये ओव्हलचं मैदान मारण्यात यश आलेलं आहे. कसोटीच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांवर संपवत १५७ रन्सनी बाजी मारली. १९७१ साली भारताने ओव्हलच्या मैदानावर आपला पहिला आणि शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. यानंतर तब्बल ५० वर्षांनी ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आलंय.
१९७१ नंतर झालेल्या सामन्यांपैकी ३ सामना अनिर्णित राहिले तर ३ सामन्यांत इंग्लंडने बाजी मारली होती. यादरम्यान भारताला या मैदानावर कधीच यश आलं नव्हतं. परंतू कोहलीच्या टीमने ५० वर्षांनी हा इतिहास बदलून दाखवला.
Breaking News : टीम इंडियाचे प्रशिक्षक Ravi Shastri यांना कोरोनाची लागण
चौथ्या दिवसाअखेरीस इंग्लंडच्या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता ७७ धावा केल्या. अखेरच्या दिवशी हासीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी सावध सुरुवात केली. अखेरीस शार्दुल ठाकूरने बर्न्सला पंतकरवी आऊट केलं. बर्न्सने ५० धावा केल्या. यानंतर ड्वाइड मलान ठराविक अंतराने चोरटी धाव काढताना धावबाद झाला. दुसऱ्या बाजूला हासीब हमीदने एक बाजू लावून धरली होती. यादरम्यान त्याने आपलं अर्धशतकही साजरं केलं.









