Women T20 World cup : भारत आणि ऑस्ट्रेलियात फायनलसाठी लढत; कोण मारणार बाजी?
Ind vs aus semifinal : ICC महिला T20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia semifinal match) यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. (Indian team in B group) भारतीय संघाने ब गटात दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर (Australian team in […]
ADVERTISEMENT
Ind vs aus semifinal : ICC महिला T20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia semifinal match) यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. (Indian team in B group) भारतीय संघाने ब गटात दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर (Australian team in A group ) ऑस्ट्रेलियाने ‘अ’ गटातील त्यांचे सर्व सामने जिंकले. Who will win the match Between India vs Australia?
ADVERTISEMENT
महिला क्रिकेट टीमचा ऐतिहासिक विजय; 36 धावांवर टीम केली ऑलआउट, 6 ओव्हरमध्ये संपवला सामना
उपांत्य फेरीच्या सामन्यात केपटाऊनमधील हवामानाकडेही चाहत्यांची नजर असेल. तुम्हाला आठवत असेल की भारतीय संघ त्यांच्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरला तेव्हा पाऊस पडला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार निर्णय झाला. यावेळी चांगली गोष्ट म्हणजे हवामान अहवालानुसार, केपटाऊनमध्ये पावसाची फारशी शक्यता नाही. क्रिकेटसाठी योग्य परिस्थिती असून संपूर्ण खेळ होण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
सामना पावसामुळे रद्द झाल्यास हा निर्णय होईल
या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडला आणि निकाल मिळविण्यासाठी किमान षटके टाकली गेली नाहीत, तर काळजी करण्याचं कारण नाही. खरे तर आयसीसीने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे 23 फेब्रुवारीला सामना होऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारीला सामना जिथे थांबला होता तिथून सुरू होईल.
राखीव दिवशीही निर्णय झाला नाही तर
दोन्ही दिवशी अजिबात सामना झाला नाही. म्हणजेच नाणेफेक न करता किंवा एकही षटक न खेळता पावसामुळे सामना रद्द झाला, तर गट टप्प्यातील गुणतालिकेच्या आधारे निर्णय घेतला जाईल. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचेल कारण ते आपल्या गट-अ मध्ये अव्वल स्थानावर आहे.
ADVERTISEMENT
Womens T20 World Cup: रोहित शर्माला मागे टाकत, ‘या’ महिला क्रिकेटरने रचला विक्रम!
ADVERTISEMENT
येथील खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल राहते न्यूलँड्स क्रिकेट मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. अशा परिस्थितीत या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन्ही बाजूंच्या वेगवान गोलंदाजांची मोठी भूमिका असेल. यासोबतच फलंदाजांनाही या विकेटवर स्वत:ला सांभाळून खेळावे लागेल आणि सुरुवातीच्या स्पेलमध्ये बाद होण्याचे टाळावे लागेल. एकदा फलंदाज सेट झाल्यानंतर ते मुक्तपणे धावा करू शकतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारतासाठी सोपा असणार नाही. टीम इंडियाने महिला क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 30 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये फक्त सात जिंकले आहेत. आणि ऑस्ट्रेलियाने 22 सामन्यांत विजय मिळवला. भारताचा ऑस्ट्रेलियावर शेवटचा विजय गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता जेव्हा त्यांनी सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता.
दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू -11 भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर.
ऑस्ट्रेलिया: मेग लॅनिंग (सी), बेथ मुनी, अलिसा हिली, अलिसा पेरी, ऍशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, एलाना किंग, मेगन शुट, डी’आर्सी ब्राउन.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT