T20 WC: ‘रोहितला ओपनिंगला का नाही पाठवलं?’, सुनील गावसकर प्रचंड संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दुबई: टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास धुसर झाल्या आहेत. दुबईत रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. याआधी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

ADVERTISEMENT

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सामन्यात सलामीची जोडी बदलण्याची काय गरज होती? असा सवाल गावसकर यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात केएल राहुलसोबत ईशान किशनला ओपनिंगसाठी पाठवण्यात आलं होतं. त्याचवेळी गेली अनेक वर्ष भारतासाठी ओपनिंग करून खोऱ्याने धावा करणाऱ्या रोहित शर्माला तिसऱ्या नंबर पाठविण्याक आलं.

गावसकर ‘आज तक’शी बोलताना म्हणाले, ‘तुम्ही एका युवा खेळाडूला सलामीला पाठवता. तर दुसरी रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूला तुम्ही खालच्या क्रमांकावर खेळवता. जर रोहित शर्माने स्वत: असं म्हटलं असेल की, त्याला 3 नंबरवर खेळायचे आहे तर गोष्ट वेगळी आहे. पण जर रोहितने स्वत: सांगितलं नसेल की त्याला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. तर तर रोहितला पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीसाठी पाठवायला हवं होतं.’

हे वाचलं का?

गावसकर पुढे म्हणाले, ‘तुम्ही सलामीची जोडी फोडली आणि नवा खेळाडू त्या जागी पाठवला. त्यानंतर रोहितला नंबर-3 आणि कोहलीला नंबर-4 वर पाठवलं. मला वाटतं हा निर्णय एकट्या कोहलीचा नसून संपूर्ण थिंक टँकचा निर्णय असेल. सुरुवातीला इशान किशनने 70-80 धावा केल्या असत्या तर सर्वांनी हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले असतं. पण आता निर्णय चुकल्याने तुम्हालाही टीका सहन करावी लागेल.’

ओपनिंगमध्ये प्रयोग करणं पडलं महागात

ADVERTISEMENT

सूर्यकुमार यादव हा दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी युवा फलंदाज इशान किशनला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली. अशावेळी टीम इंडियाने अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात इशान किशन आणि केएल राहुल यांना ओपनर म्हणून पाठवलं. टीम इंडियाच्या या नव्या प्रयोगाने खरं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. पण दोन्ही ओपनर भारताला चांगली सुरुवात करुन देतील अशी सर्वांना आशा वाटत होती. पण तसं झालं नाही. हे दोन्ही ओपनर विशेष काही करू शकले नाही.

ADVERTISEMENT

इशान किशन अवघ्या चार धावा करून ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर डॅरिल मिशेलकरवी झेलबाद झाला. त्याचवेळी केएल राहुल 18 धावांवर टीम साऊथीचा बळी ठरला. इथून भारताचा डाव गडगडला आणि ते 120 धावांचा टप्पाही पार करू शकले नाही. त्यामुळे ओपनिंगला रोहितऐवजी ईशान किशनला पाठविण्याचा टीम इंडियाचा प्रयोग पूर्णपणे फसला आणि पर्यायाने पराभव देखील स्वीकारावा लागला.

‘We were not brave enough’, विराट कोहलीच्या वक्तव्यावर कपिल देव भडकले, म्हणाले…

ग्रुपमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर

दरम्यान, या विजयासह न्यूझीलंड ग्रुप-2 च्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तान या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामन्यांत 6 पॉईंट मिळवले आहेत. 3 सामन्यात दोन विजयांसह अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. नामिबिया चौथ्या, भारत पाचव्या आणि स्कॉटलंडचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT