IPL 2021 : KKR कडून RCB चा धुव्वा, पहिल्याच सामन्यात विराटच्या संघाला अपयश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीच्या RCB संघालाही युएईत पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अबु धाबी च्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने RCB चा ९ विकेटने धुव्वा उडवला आहे. RCB ला ९२ धावांवर आऊट केल्यानंतर कोलकात्याने शुबमन गिलची विकेट गमावत विजयासाठी दिलेलं आव्हान सहज पूर्ण केलं.

ADVERTISEMENT

नाणेफेक जिंकून विराट कोहलीने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. परंतू संघाची सुरुवात चांगली झाली नाही. प्रसिध कृष्णाने विराटला ५ धावांवर आऊट करत RCB ला पहिला धक्का दिला. यानंतर के.एस.भरत आणि पडीक्कल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. लॉकी फर्ग्युसनने पडीक्कलला आऊट करत RCB ला आणखी एक धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने RCB चे फलंदाज माघारी परतत राहिले.

भरवशाच्या ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हीलियर्स यांनाही लवकर गुंडाळण्यात कोलकात्याच्या बॉलर्सना यश आलं. वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल यांनी प्रत्येकती ३-३, लॉकी फर्ग्युसनने दोन तर प्रसिध कृष्णाने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरादाखल कोलकात्याने या सामन्यात नवोदीत व्यंकटेश अय्यरला शुबमन गिलसोबत संधी दिली.

हे वाचलं का?

Virat Kohli चा महत्वाचा निर्णय, IPL 2021 नंतर RCB ची कॅप्टन्सी सोडणार

परंतू कोलकात्याची ही जोडी RCB च्या बॉलर्सना चांगलीच भारी पडली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची अभेद्य भागीदारी करुन RCB च्या आव्हानातली हवाच काढून टाकली. युजवेंद्र चहलने गिलला ४८ धावांवर आऊट करत RCB ला एकमेव यश मिळवून दिलं. परंतू व्यंकटेश अय्यरने यानंतर विजयासाठी आवश्यक धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. अय्यरने २७ बॉलमध्ये ७ चौकार एका षटकारासह ४१ धावा केल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT