IPL 2021 : मॉर्गनविरुद्ध झालेल्या वादावर आश्विनचं स्पष्टीकरण, म्हणाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL च्या चौदाव्या हंगामात शारजाहच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात आश्विन आणि कोलकात्याचा कॅप्टन मॉर्गममध्ये भर मैदानात चांगलीच खडाजंगी झाली. हा वाद वेळेतच मिटला असला तरीही मैदानाबाहेर याचे पडसाद उमटणं सुरु आहे.

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांसह अनेक माजी खेळाडूंनी या वादासाठी आश्विनला जबाबदार धरत त्याच्या वागण्यामुळे खेळभावनेला तडा गेल्याचं म्हणलं. या वादावर आश्विनने आता ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलंय.

जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं, त्या सामन्यावेळी??

हे वाचलं का?

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या १९ व्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर केकेआरचा खेळाडू राहुल त्रिपाठीने थ्रो फेकला. त्याने फेकलेला चेंडू पंतला लागून दूर गेला. यानंतर अश्विन-पंत अतिरिक्त रनसाठी धावले. केकेआरचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या म्हणण्यानुसार मॉर्गनला ही गोष्ट पटली नाही. त्यानंतर साऊदीने आश्विनला बाद केले आणि अश्विन पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन आश्विनला उद्देशून काहीतरी बोलला, ज्यानंतर अश्विन रागाने मॉर्गनच्या दिशेने जाऊ लागला. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर कार्तिकने हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला.

या सर्व वादावर आश्विननेही आपलं उत्तर दिलं आहे. आश्विनने आपल्या ट्विटमध्ये काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. “ऋषभ पंतला चेंडू लागल्याचे पाहिले असते, तर मी धावलो असतो का? मॉर्गनने सांगितल्याप्रमाणे मी बदनाम आहे का? आणि मी भांडलो का”? उत्तरादाखल अश्विन म्हणतो, “फिल्डरचा थ्रो पाहून मी धावलो आणि त्याची मला परवानगी आहे. मी मॉर्गनने म्हटल्याप्रमाणे बदनाम नाही आणि मी भांडलो नाही, तर मी स्वत: साठी उभा राहिलो आणि हेच माझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी मला करायला शिकवले. मॉर्गन किंवा साऊदीच्या क्रिकेटच्या जगात त्यांना जे योग्य किंवा अयोग्य वाटते त्यावर टिकून राहू शकतात परंतु त्यांना मैदानावर नैतिकता सांगण्याचा किंवा अपमानास्पद शब्द वापरण्याचा अधिकार नाही.”

ADVERTISEMENT

अश्विन पुढे म्हणाला, “याहूनही महत्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोक यावर चर्चा करत आहेत आणि इथे चांगली आणि वाईट व्यक्ती कोण आहे याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर तुम्ही रन नाकारली किंवा नॉन स्ट्रायकरला इशारा दिला तर तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून संबोधले जाईल, असे सांगून त्यांना गोंधळात टाकू नका, कारण हे सर्व लोक जे तुम्हाला चांगले किंवा वाईट म्हणत आहेत त्यांनी आधीच उपजीविका केली आहे.”

ADVERTISEMENT

त्यामुळे आश्विनने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर तरी या वादावर पडदा पडेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. दरम्यान दिल्लीचा संघ टॉप ४ मध्ये आपली जागा पक्की केली असून कोलकाता नाईट रायडर्स संघाला टॉप ४ मध्ये आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्ससोबत स्पर्धा करावी लागणार आहे.

IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याची मुंबई इंडियन्सला किती संधी?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT