IPL 2021 : सलग दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, चौथं स्थान गमावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गतविजेत्या मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या चौदाव्या हंगामात उत्तरार्धात खराब सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सनेही मुंबईचं आव्हान ७ विकेट राखून परतवलं आहे.

ADVERTISEMENT

या पराभवा मुंबई इंडियन्सने पॉईंट्स टेबलमधलं आपलं चौथं स्थान गमावलं असून कोलकात्याचा संघ लागोपाठ दोन विजयांसह चौथ्या स्थानावर उडी मारली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. संघात पुनरागमन केलेल्या रोहित शर्माने क्विंटन डी-कॉकच्या साथीने चांगली सुरुवात करुन दिली. दोन्ही बॅटर्सनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची पार्टनरशीप करत कोलकात्याच्या बॉलिंगवर हल्लाबोल चढवला. ही जोडी कोलकात्याला महागात पडणार असं वाटत असताच सुनील नरीनने रोहित शर्माला आऊट केलं, त्याने ३३ रन्स केल्या.

हे वाचलं का?

यानंतर दुर्दैवाने मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांना फटकेबाजी जमली नाही. सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या हे ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. एकीकडे क्विंटन डी-कॉकने एक बाजू लावून धरत फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नसल्यामुळे तो देखील फटकेबाजीच्या प्रयत्नात ५५ धावा काढून माघारी परतला. निर्धारित ओव्हर्समध्ये मुंबईने १५५ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याकडून फर्ग्युसन आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी २-२ तर सुनील नरीनने १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सने आश्वासक सुरुवात केली. शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी चांगली सुरुवात केल्यानंतर बुमराहने गिलला क्लिन बोल्ड केलं. यानंतर व्यंकटेश अय्यरने राहुल त्रिपाठीच्या साथीने संघाचा डाव सावरत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली.

ADVERTISEMENT

कोलकात्याची ही जोडी मैदानात मुंबईला भारी पडत असताना बुमराहने अय्यरला क्लिन बोल्ड केलं. अय्यरने ३० बॉलमध्ये ४ फोर आणि ३ सिक्स लगावत ५३ रन्स केल्या. बुमराहने कॅप्टन मॉर्गनलाही आऊट केलं. परंतू राहुल त्रिपाठीने नितीश राणाच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ADVERTISEMENT

Batsman नाही Batter, MCC कडून क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्वाचा बदल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT