IPL 2022 SRH vs RR : आज राजस्थान आणि हैदराबाद आमने-सामने; कोण देणार विजयी सलामी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या हंगामात रोमांचक सामने बघायला मिळत असून, आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स विजयी सलामी देण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघांनी आयपीएलचे प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावलेलं असून, आज पुण्यातील एमसीए मैदानावर कोण बाजी मारणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे.

यावेळी पार पडलेल्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने अनेक मॅच विनर खेळाडूंना पुन्हा खरेदी केलेलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीची मदार कर्णधार संजू सॅमसन जास्त असेल. मागील काही वर्षांपासून संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून खेळत आलेला आहे. मात्र, त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

राजस्थान रॉयल्सने दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली २००८ पहिल्याच आयपीएल चषकावर नाव कोरलं होतं. मात्र, त्यानंतर संघाची कामगिरी चांगली राहिली नाही. संजू सॅमसनला प्रत्येक हंगामातील एक-दोन सामन्यातच चांगली कामगिरी करता आलेली आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा चषक पटकवायचा असेल, तर संजू सॅमसनला त्याच्या कामगिरीत सातत्य ठेवावं लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सलामीसाठी राजस्थान रॉयल्सकडे तीन पर्याय आहेत. जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जायस्वाल यांच्यापैकी कोणत्या दोघांना राजस्थान सलामीला पाठवण्याचा निर्णय घेते, यावरही बरंच अवलंबून असेल. सध्या तरी देवदत्त आणि यशस्वी यांनाच सलामीला पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

मधल्या फळीत रायस्थान रॉयल्सकडे मोठे फटके मारण्याची क्षमता असलेले शिमरॉन हेटमेयर, रॅसी वॉन डूसेन, जिमी नीशाम आणि रियान पराग यांच्यासारखे खेळाडू आहेत. गोलंदाजीत राजस्थानची मदार जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टसह रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांच्यावर असेल. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनी यांच्या कामगिरीवरही लक्ष असणार आहे.

सनरायझर्स हैदराबादकडे भेदक मारा

ADVERTISEMENT

सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीबाबत बोलायचं झालं, तर कर्णधार केन विल्यमसन सर्वाधिक अनुभवी फलंदाज आहे. त्याचबरोबर हैदराबादच्या मधल्या फळीत निकोलस पूरन, प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठी असतील. विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आल्यास रविकुमार समर्थ सलामीला खेळताना दिसू शकतो. त्याचबरोबर हैदराबादकडून अब्दुल समदवर फिनिशरची भूमिका असेल.

ADVERTISEMENT

हैदराबादच्या गोलंदाजीचं नेतृत्व भुवनेश्वर कुमारकडे असेल. त्याच्याबरोबर उमरान मलिक आणि टी. नटराजन असणार आहे. नटराजनच्या यॉर्कर मारा राजस्थानसमोर आव्हानात्मक असेल. फिरकी गोलंदाजामध्ये वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस गोपाल आमि जे सुचित यांची कामगिरी संघाच्या विजयात महत्त्वाची असेल.

सामन्यादरम्यान पुण्यातील हवामान सामान्य असण्याचा अंदाज आहे. सामन्या दरम्यान तापमान २५ ते २९ सेल्सिअस असू शकतं. सायंकाळी दव पडू शकतात, त्यामुळे गोलंदाजासमोर ते आव्हान असेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT