IPL 2024 Retention : KKR ने सोडला ‘लॉर्ड’ खेळाडू, दिल्ली कॅपिटल्स पृथ्वी शॉला…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Shahrukh's team releases Shardul Thakur, Prithvi Shaw will remain with Delhi Capitals
Shahrukh's team releases Shardul Thakur, Prithvi Shaw will remain with Delhi Capitals
social share
google news

IPL 2024 Released Players : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२४ च्या हंगामासाठी १९ डिसेंबर रोजी दुबईत लिलाव होणार आहे. या लिलावाच्या अनुषंगाने 10 संघ आर्थिक आणि संघातील खेळाडूंची गणितं जुळवताना दिसत आहेत. दुसरीकडे बीसीसीआयने सर्व संघांना त्यांची रिटेंशन यादी सादर करण्यास सांगितले आहे. ही यादी सादर करण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर असून, खेळाडूंच्या रिटेंशनबद्दल काही महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. यात केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या खेळाडूंबद्दल निर्णय जाहीर केले आहेत.

ADVERTISEMENT

दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals)ने सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ काऊंटी क्रिकेट खेळताना जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्याला मार लागलेला आहे. दुसरीकडे शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला रिलीज केले आहे.

लॉर्ड शार्दूल ठाकूरसाठी मोजले होते 10.75 कोटी

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२३ च्या लिलावात शार्दूल ठाकूरला 10.75 कोटी रुपयांत खरेदी केले होते. आता शार्दूलला रिलीज केल्यामुळे केकेआरच्या तिजोरीत 10.75 कोटी वाढणार आहे. शार्दूल ठाकूरची विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली होती. त्याला तीन सामन्यात खेळण्याचीच संधी मिळाली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> IPL Transfer Window 2024 : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार? रोहित शर्मा बदलणार टीम!

दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि टीमचे संचालक सौरव गांगुलीला पृथ्वी शॉच्या क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळेच दिल्लीने जायबंदी असूनही पृथ्वी शॉला टीममध्ये कायम ठेवले आहे. २०२४ च्या आयपीएल हंगामापर्यंत पृथ्वी शॉ फीट होईल, अशी आशा आहे. दिल्ली कॅपिटल्सने यापूर्वीच सरफराज खान आणि मनीष पांडे यांना रिलीज केले आहे.

आरसीबीने केला मोठा बदल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन संघांनी फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद आणि मयंक डागर यांची आपसात खरेदी-विक्री केली आहे. शाहबाज आता हैदराबादकडून खेळताना दिसेल, तर मयंक डागर आरसीबीकडून. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने आयपीएल २०२४ मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रुट राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायचा.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> IPL ऑक्शनआधीच मोठा करार! राजस्थानकडून 10 करोडमध्ये ‘हा’ खेळाडू खरेदी

ADVERTISEMENT

हार्दिक पांड्या खेळणार मुंबई इंडियन्सकडून?

आयपीएल रिटेंशनबद्दल मोठी माहिती म्हणजे गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सकडून दिली जाण्याची दाट शक्यता आहे. ईएसपीएन क्रिकइन्फो च्या रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्स संघात परतणार आहे. हा व्यवहार रोखीने होणार आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला १५ कोटी रुपये देणार आहे. ही डील झाली, तर हा आयपीएलमधील सर्वात मोठा व्यवहार ठरेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT