IPL 2025 Final: कोहलीला मैदानावरच रडू कोसळलं.. 6 रनने RCB ने IPL ची ट्रॉफी जिंकली!
IPL 2025 Won RCB: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) च्या अंतिम सामन्यात आरसीबीने 6 धावांनी विजय मिळवला. या विजयासह, आरसीबी 17 वर्षांनी आयपीएलचा विजेता बनला आहे.
ADVERTISEMENT

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings: RCB ने तब्बल 17 वर्षांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) चे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. या विजयासाठी आरसीबीला प्रदीर्घ वाट पाहावी लागली. म्हणूनच आरसीबीचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला मैदानावरच अश्रू अनावर झाले.
या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकली आणि आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 9 विकेट गमावून 190 धावा केल्या. ज्यामध्ये कोहलीच्या 43 धावा होत्या. त्याच वेळी पंजाबकडून जेमीसन आणि अर्शदीपने 3-3 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्ज फक्त 184 धावा करू शकला आणि आरसीबीने हे विजेतेपद जिंकले.
हे ही वाचा>> PBKS vs MI Qualifier 2, IPL 2025: जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने कोणाला धरलं जबाबदार?
दरम्यान, या हंगामात आपल्याला एक नवीन विजेता मिळाला आहे. 2008 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत दोन्ही संघांनी कधीही विजेतेपद जिंकलेले नव्हतं.
पंजाब किंग्जची फलंदाजी
पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली. प्रियांश आर्य आणि 'इम्पॅक्ट सब' प्रभसिमरन सिंग यांनी मिळून 5 षटकांत 43 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी जोश हेझलवूडने मोडली, ज्याने प्रियांश आर्यला फिल साल्टद्वारे झेलबाद केलं. प्रियांशने 24 धावा केल्या. त्यानंतर, जोश इंग्लिश आणि प्रभसिमरन यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण 9व्या षटकात प्रभसिमरन बाद झाला. प्रभसिमरनने 26 धावा केल्या.










