PBKS vs MI Qualifier 2, IPL 2025: जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने कोणाला धरलं जबाबदार?

मुंबई तक

1 जून (रविवार) रोजी IPL च्या पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) ने मुंबई इंडियन्स (MI) चा 5 विकेट्सने पराभव केला. सामन्यानंतर हार्दिकने पंजाब संघाच्या विजयाचं कर्णधार श्रेयसला श्रेय दिलं. तसेच मॅचदरम्यान मुंबईच्या संघाच्या काय चूका झाल्या? याबद्दल सांगितलं.

ADVERTISEMENT

जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने कोणाला धरलं जबाबदार?
जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने कोणाला धरलं जबाबदार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

PBKS vs MI क्वालिफायर सामन्यात MI चा पराभव

point

MI च्या पराभवासाठी हार्दिकने कोणाला धरलं जबाबदार?

point

पंजाबच्या विजयाचं श्रेय श्रेयस अय्यरला

PBKS vs MI: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) ने मुंबई इंडियन्स (MI) चा 5 विकेट्सने पराभव केला. 1 जून (रविवार) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबला जिंकण्यासाठी 204 धावांचे लक्ष्य मिळाले होते आणि हे लक्ष्य त्यांनी 6 चेंडू शिल्लक असतानाच गाठले.

RCB सोबत रंगणार अंतिम सामना

MI सोबतच्या सामन्यात विजय मिळवून पंजाब किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला.  आता त्यांचा त्यांचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यासोबत होणार आहे. मात्र या सामन्यातील पराभवामुळे सहाव्यांदा विजेतेपद जिंकण्याचे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगले. अंतिम सामना 3 जून रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने क्वालिफायर 2 सामना गमावल्यानंतर आपले दुःख व्यक्त केले. हार्दिक पंड्याने श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जच्या विजयाचे श्रेय दिले. या सामन्यात श्रेयसने नाबाद 87 धावा केल्या आणि सामना पूर्णपणे मुंबई इंडियन्सच्या आवाक्याबाहेर नेला. हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी टीमच्या गोलंदाजांना जबाबदार ठरवले. 

या सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, "श्रेयस अय्यरने खूप चांगली फलंदाजी केली, त्याने संधी मिळवल्या. त्याचे काही शॉट्स खरोखरच अद्भुत होते. याचे पूर्ण श्रेय त्यांच्या फलंदाजीच्या युनिटला जाते. त्याने उत्तम फलंदाजी केली. आम्हाला विशेषत: या मोठ्या समान्यात चांगल्या गोलंदाजीच्या परफॉर्मन्सची गरज होती."

हे वाचलं का?

    follow whatsapp