4,4,4,4,4,4... IPL स्टारचा टेस्ट क्रिकेटमध्ये धमाका! षटकार मारून अर्धशतक ठोकलं ; VIDEO होतोय व्हायरल
Jason Holder Batting Video: वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा सामना १५ ऑगस्टपासून प्रोविडेंसच्या मैदानात रंगला आहे. हिल्या इनिंगमध्ये आफ्रिका संघ अवघ्या १६० धावांवर गारद झाला. दुसरीकडे वेस्टइंडिजच्या संघाचीही दाणादाण उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आयपीलच्या स्टार खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल
मैदानात पाडला चौकार षटकारांचा पाऊस
वादळी खेळीचा व्हिडीओ एकदा पाहाच
Jason Holder Batting Video: वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा सामना १५ ऑगस्टपासून प्रोविडेंसच्या मैदानात रंगला आहे. हिल्या इनिंगमध्ये आफ्रिका संघ अवघ्या १६० धावांवर गारद झाला. दुसरीकडे वेस्टइंडिजच्या संघाचीही दाणादाण उडाली आहे. १६० धावांचा पाठलाग करताना संपूर्ण कॅरिबियन संघ १४४ धावांवर सर्वबाद झाला.
वेस्टइंडिजचा संघ स्वस्तात माघारी परतला असता. परंतु, खालच्या स्थानी फलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने ५४ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे आफ्रिकेला टार्गेटच्या जवळ पोहोचण्यात यश आलं. होल्डरने आक्रमक फलंदाजी करून चौकार-षटकारांचा पाऊस पाडला अन् अर्धशतकाला गवसणी घातली. होल्डरच्या तुफानी खेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा >> "...तर महिलांसोबत उपोषणालाच बसेल...", सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, नेमकं प्रकरण काय?
इथे पाहा जेसन होल्डरच्या वादळी खेळीचा व्हिडीओ
३२ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने ६ व्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने या इनिंगमध्ये ८८ चेंडूत ६१.३६ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. होल्डरने षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं, हे या इनिंगचं खास वैशिष्ट्य आहे. होल्डरने ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर अर्धशतक ठोकलं.










