वृद्धीमान साहाला धमकी, पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्यावर BCCI कडून दोन वर्षांची बंदी

मुंबई तक

भारतीय कसोटी संघाचा विकेटकिपर वृद्धीमान साहाला धमकावल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. बीसीसीआयने स्थापन केलेल्या समितीने मुजुमदार यांना दोषी मानून त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. मुलाखत देण्यासाठी नकार दिल्यामुळे मुजुमदार यांनी साहाला, धमकी दिली होती. बीसीसीआयने या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर मुजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालून त्यांना या काळात कोणत्याही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतीय कसोटी संघाचा विकेटकिपर वृद्धीमान साहाला धमकावल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. बीसीसीआयने स्थापन केलेल्या समितीने मुजुमदार यांना दोषी मानून त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. मुलाखत देण्यासाठी नकार दिल्यामुळे मुजुमदार यांनी साहाला, धमकी दिली होती.

बीसीसीआयने या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर मुजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालून त्यांना या काळात कोणत्याही खेळाडूंशी मुलाखतीकरता संपर्क साधता येणार नाही असंही सांगण्यात आलं आहे. साहाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने एका समितीची स्थापना केली होती.

ज्यात बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरुण धुमाळ, प्रभतेज सिंह भाटीया यांचा समावेश होता. या समितीने मुजुमदार यांनी साहाला मोबालईलवर पाठवलेला मेसेज हा धमकीचाच असल्याचं मान्य केलं आहे.

बोरिया मुजुमदार यांच्यावर अशी होणार आहे कारवाई –

1) दोन वर्षांची बंदी, या काळात मुजुमदार यांनी बीसीसीआयचं Accreditation मिळणार नाही. कोणत्याही आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सामन्यांचं वृत्तांकन मुजुमदार यांना करता येणार नाही.

2) बीसीसीआयशी संलग्न असलेल्या कोणत्याही खेळाडूची पुढील दोन वर्षांकरता मुजुमदार यांना मुलाखत घेता येणार नाही.

3) या काळात मुजुमदार यांना Accreditation मधून मिळणाऱ्या कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत.

काही दिवसांपूर्वी बोरिया मुजुमदार यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या स्पष्टीकरणाचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. ज्यात मुजुमदार यांनी वृद्धीमान साहाने आपल्या दोघांमध्ये झालेलं संभाषण एडीट करुन चुकीच्या पद्धतीने समोर आणल्याचं सांगितलं. परंतू मुजुमदार यांचा हा युक्तीवाद ग्राह्य धरला गेला नाही.

बोरिया मुजुमदार यांनी वृद्धीमान साहाला केलेल्या मेसेजमध्ये, तू माझ्या कॉलला उत्तर दिलं नाहीस. त्यामुळे यापुढे मी तुझा इंटरव्ह्यू कधीच करणार नाही. मी अशा गोष्टी विसरत नाही अशी धमकी दिली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp