IPL 2023 : नवा रेकॉर्ड! आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

kkr vs rcb : sunil naraine varun chakravarthy suyash sharma make big record
kkr vs rcb : sunil naraine varun chakravarthy suyash sharma make big record
social share
google news

आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू असून, कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात एक इतिहास घडला. केकेआरच्या एक-दोन नव्हे तर तीन मिस्ट्री स्पिनर्संनी ईडन गार्डन्सच्या मैदानात अक्षरशः गोलंदाजीने आरसीबीच्या फलंदाजांना जेरीस आणले.

ADVERTISEMENT

सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा या तिघांनी मिळून अशी फिरकी गोलंदाजी केली की, विराट कोहलीसह आरसीबी संघाला बाहेर शेवटपर्यंत सावरता आलं नाही आणि 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ 123 धावांवर गुंडाळला गेला. या तीन फिरकीपटूंमुळे आरसीबीला सामन्यात 81 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. नरेन, चक्रवर्ती आणि सुयश या त्रिकुटाने मिळून एका डावात १० पैकी ९ बळी घेतले. त्यामुळे आयपीएलचा १६ वर्षांचा इतिहास बदलला.

असा विक्रम पहिल्यांदाच घडलं…

घरच्या मैदानावर केकेआरकडून अनुभवी फिरकी गोलंदाज सुनील नरेनने दोन बळी घेत घेतले. वरुण चक्रवर्तीने चार बळी घेतले, तर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या 19 वर्षीय सुयश शर्माने तीन बळी घेत आरसीबीची फलंदाजी उद्ध्वस्त केली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> IPL 2023: वडील कारगिल युद्धात लढले, मुलाने IPLमध्ये दाखवला दम; कोण आहे ध्रुव जुरेल?

आयपीएलच्या आतापर्यंतच्या 16 वर्षांच्या इतिहासात स्पिनर्संनी एका डावात 10 पैकी 9 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर दोन्ही डाव मिळून म्हणजे 40 षटकात फिरकीपटूंनी एकूण 12 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात हा एक विक्रम ठरला आहे. केकेआरच्या फिरकीपटूंशिवाय आरसीबीच्या फिरकीपटूंनी मिळून तीन बळी घेतले.

IPL इतिहासात एका डावात फिरकीपटूंनी घेतलेले सर्वाधिक बळी

9 बळी – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता, 2023
8 बळी – दिल्ली विरुद्ध चेन्नई, विझाग, 2012

ADVERTISEMENT

आयपीएल इतिहासातील सामन्याच्या दोन्ही डावात फिरकीपटूंनी घेतलेले सर्वाधिक बळी

12 बळी – केकेआर विरूद्ध आरसीबी, कोलकाता, 2023
11 बळी –  पंजाब विरुद्ध कोलकाता, कोलकाता, 2012

ADVERTISEMENT

IPL Chart : आरसीबीची चार स्थानांनी घसरण

केकेआरने मोठा पराभव केल्याने आरसीबीला मोठा फटका बसला आहे. मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव केल्यानंतर आरसीबीचा नेट रन रेट +1.981 इतका झाला होता. मात्र, केकेआरकडून तब्बल 81 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने आरसीबीचा नेट रन रेट खूपच खाली गेला आहे. आरसीबी संघ केकेआर विरुद्धचा सामना होण्यापूर्वी तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, आता दोन गुण आणि -1.256 नेट रन रेटसह सातव्या स्थानावर पोहोचली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT