LBW चा नियम कधी लागू झाला? क्रिकेटमधील ही रंजक गोष्ट तुम्हाला माहितीए?
LBW In Cricket : क्रिकेटमध्ये LBW चा नियम कसा आणि कधी चालू झाला? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

क्रिकेटमध्ये LBW चा नियम कसा आणि कधी चालू झाला?

LBW चा नियमाला किती साली सुरुवात झाली?
LBW In Cricket : भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. या खेळाशी लोकांच्या भावना घट्ट जोडलेल्या आहेत. आज आपण या खेळातील सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या नियमांपैकी एक — एलबीडब्ल्यू (लेग बिफोर विकेट) च्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत.
कधी लागू झाला नियम?
लेग बिफोर विकेट (LBW) हा नियम क्रिकेटमधील सर्वात जुना आणि महत्त्वाचा नियम मानला जातो. हा नियम प्रथम 1774 साली लागू करण्यात आला. त्या काळात फलंदाज बॉल स्टंपला लागू नये म्हणून जाणूनबुजून आपले पाय वापरत असत. या अन्यायाला आळा घालण्यासाठी हा नियम तयार करण्यात आला.
सुरुवातीला एखाद्या फलंदाजाला एलबीडब्ल्यू आउट देण्यासाठी हे सिद्ध करावे लागायचे की त्याने मुद्दामहून आपल्या पायाने चेंडू अडवला आहे. पण 1839 मध्ये या नियमात बदल करण्यात आला आणि अंपायरसाठी फलंदाजाचा हेतू सिद्ध न करता एलबीडब्ल्यू आउट देणे सुलभ झाले.
यानंतर 1980 मध्ये या नियमात पुन्हा सुधारणा करण्यात आली. आता जर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाला आणि फलंदाजाने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला नाही, तरी त्याला एलबीडब्ल्यू आउट देता येऊ लागले.