LSG vs MI : 6,0,4,4,6,4…लखनऊच्या मार्कस स्टॉईनिसकडून मुंबईच्या बॉलरची अक्षरश धुलाई
Marcus Stoinis vs Chris jordan Hits 24 Runs in over : लखनऊ सुपर जाएंटसच्या (Lucknow Super Giants) मार्कस स्टॉईनिसची (Marcus Stoinis) तुफानी खेळी आज पाहायला मिळाली. स्टॉईनिसने 89 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या बळावर 20 ओव्हरमध्ये लखनऊने 3 विकेट गमावून 177 धावा ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
Marcus Stoinis vs Chris jordan Hits 24 Runs in over : लखनऊ सुपर जाएंटसच्या (Lucknow Super Giants) मार्कस स्टॉईनिसची (Marcus Stoinis) तुफानी खेळी आज पाहायला मिळाली. स्टॉईनिसने 89 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या बळावर 20 ओव्हरमध्ये लखनऊने 3 विकेट गमावून 177 धावा ठोकल्या आहेत. आता मुंबईला (Mumbai Indians) विजयासाठी 178 धावांची गरज आहे.(lsg marcus stoinis hits 24 runs in chris jordan over mumbai indians vs lucknow super giants)
ADVERTISEMENT
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय़ घेतला होता. त्यामुळे लखनऊ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) प्रथम फलंदाजीस उतरली होती. मात्र लखनऊची सुरूवात चांगली झाली नाही. लखनऊकडून सलामीला उतरलेला दीपक हुडा आणि क्विंटन डिकॉक मोठी खेळी न करताच आऊट झाले. दिपक हूडा 5 तर डिकॉकने 16 धावा केल्या. तसेच इम्पॅक्ट प्लेयरसच्या रूपात उतरलेला प्रेरक मान्कडही शुन्यावर बाद झाला.
हे ही वाचा : हैदराबादविरूद्ध सामन्यात गुजरातने जर्सी का बदलली? काय आहे कारण…
प्रेरक मान्कड नंतर मैदानात उतरलेल्या कृणाल पंड्या (Krunal Pandya) आणि मार्कस स्टॉईनिसने (Marcus Stoinis) डाव सावरला आणि मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. कृणाल पंड्याचे अर्धशतक एक धावांनी हुकलं आणि रीटायर्ड झाला. कृणालने 49 धावा केल्या. तर मार्कस स्टॉईनिसने तर तुफान फटकेबाजी केली. मार्कस स्टॉईनिसने 89 नाबाद धावा केल्या. या खेळीत त्याने 8 षटकार आणि 4 चौकार मारले.
हे वाचलं का?
On what seemed like a tough track to bat on, Marcus Stoinis went after Chris Jordan in the 18th over 🔥https://t.co/i8s74hnfgx #LSGvMI #IPL2023 pic.twitter.com/9f9tpGebBd
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 16, 2023
जॉर्डनच्या ओव्हरमध्ये 24 धावा
मार्कस स्टॉईनिसने (Marcus Stoinis) जॉर्डनला धु धुतला आहे. मार्कस स्टॉईनिसने जॉर्डनच्या (chris Jordan) ओव्हरमध्ये 24 धावा काढल्या. 6,0,4,4,6,4, अशाप्रकारे जॉर्डनची धुलाई करून त्याने या धावा काढल्या आहेत. मार्कस स्टॉईनिसच्या या नाबाद 89 धावांच्या खेळीने लखनऊ सुपर जाएंटसला 20 ओव्हरमध्ये् 3 विकेट गमावून 177 धावांपर्यंत मजल मारता आली.मुंबईसमोर आता 178 धावांचे आव्हान असणार आहे. मुंबई आता हे आव्हान पुर्ण करते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘वर्ल्ड क्रिकेटमध्ये फलंदाज…’, सचिनने केले सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ सिक्सचे कौतूक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT