मॅचदरम्यान क्रिकेटरला हृदयविकाराचा झटका, मैदानावर 45 दिवसांत 8वा मृत्यू
Man got heart attack during Cricket Match: राजकोट: गुजरातमधील राजकोट येथील क्रिकेट मैदानावर एका 45 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्याचवेळी अचानक त्याला चक्कर आली तो जमिनीवर कोसळला. त्यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याला आपला जीव गमवावा लागला होता. गुजरातमधील क्रिकेट मैदानावर गेल्या दीड महिन्यात […]
ADVERTISEMENT
Man got heart attack during Cricket Match: राजकोट: गुजरातमधील राजकोट येथील क्रिकेट मैदानावर एका 45 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्याचवेळी अचानक त्याला चक्कर आली तो जमिनीवर कोसळला. त्यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याला आपला जीव गमवावा लागला होता. गुजरातमधील क्रिकेट मैदानावर गेल्या दीड महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने झालेला हा आठवा मृत्यू आहे. (man got heart attack during match 8th death in 45 days at cricket ground)
ADVERTISEMENT
जमिनीवर कोसळला क्रिकेटर
45 वर्षीय मयूर हे राजकोटच्या रेसकोर्सवरील शास्त्री मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. पण क्रिकेट खेळता-खेळता अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे ते जमिनीवर बसले आणि बसता क्षणीच ते खाली कोसळले. त्यामुळे मैदानातही घबराटीचे वातावरण निर्माण झालं. लगेच त्यांच्या सहकाऱ्यांनी अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
त्याच्या साथीदारांनी सांगितले की, मयूर हा सोनार होता आणि त्याच्या घरात तोच एकमेव कमावणारा होता. मयूरच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, तो कधीही कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन देखील करायचा नाही. त्यामुळेच अचानक घडलेल्या या वेदनादायक घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर त्यांच्या कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे वाचलं का?
दरम्यान, गेल्या काही दिवसात क्रिकेटच्या मैदानात हार्ट अॅटक येऊन मृत्यू होण्याच्या प्रकरणांमध्ये बरीच वाढ झाली आहे. यातही चिंतेची बाब म्हणजे अनेक तरूण मुलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. ज्यामुळे आता तरूण पीढिला त्यांच्या आरोग्याविषयी अधिकच जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. तसंच आपल्या आरोग्याला घातक असणारे खाद्यपदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
क्रिकेट खेळतानाच तो मैदानावर कोसळला…योग करतानाच योगा प्रशिक्षकाचा मृत्यू, अवघ्या काही सेकंदात मृत्यूने गाठलं!
ADVERTISEMENT
जीएसटी कर्मचाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका
याआधी गुजरातमधील अहमदाबादमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका जीएसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. जीएसटी कर्मचारी आणि जिल्हा पंचायतीचे कर्मचारी यांच्यात हा सामना सुरू होता. गोलंदाजी करताना जीएसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली आणि तो जमिनीवर कोसळला.
ADVERTISEMENT
गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. भयावह बाब म्हणजे या प्रकरणांमध्ये बहुतांश तरुणांचा सहभाग आहे. 25 फेब्रुवारी रोजी तेलंगणातील नांदेडमध्ये एका तरुणाचा नाचताना मृत्यू झाला होता. त्यांचे वय अवघे 19 वर्ष होते. यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना एका पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
Gujrat : सहकाऱ्यांनी पाणी दिलं अन् नंतर… क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT