उद्धव ठाकरेंची एमसीएच्या मतदानाकडे पाठ; मिलिंद नार्वेकर म्हणाले, ‘आले नाहीत, हरकत नाही’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजकारणी आणि क्रिकेटपटू आमने-सामने आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या एससीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणुकीत पवार-शेलार पॅनेलने विजय मिळवला. या निवडणुकीत ठाकरे गटातले मिलिंद नार्वेकर अपेक्स काऊन्सिल कमिटीसाठी निवडणूक लढवत होते. मिलिंद नार्वेकर सर्वाधिक मतं घेऊन विजयी झाले. त्यानंतर त्यांच्याशी मुंबई Tak ने संवाद साधला.

ADVERTISEMENT

एमसीए निवडणूक : मिलिंद नार्वेकर ठाकरेंच्या अनुपस्थितीबद्दल कायम म्हणाले?

प्रश्न – नवीन कार्यकारिणी आलेली आहे, काय वाटतं तुम्हाला?

मिलिंद नार्वेकर – कार्यकारिणीवर बाकी सगळे जुनेच आहेत, फक्त मीच नवीन आहे.

हे वाचलं का?

प्रश्न – तुम्ही राजकारणातले अनुभवी आहात. त्याचा फायदा नक्कीच इकडे होईल? पुढची कारकीर्द कशी असणार?

मिलिंद नार्वेकर – कारकीर्द जसं अध्यक्ष सांगतील. जी जबाबदारी देतील तेच करू. बाकी कसं काय करायचं ते अमोल काळेच बघतील.

ADVERTISEMENT

MCA वर पवार-शेलार पॅनेलचा बोलबाला; अमोल काळेंपाठोपाठ नार्वेकर, आव्हाडही विजयी

ADVERTISEMENT

प्रश्न – तिन्ही ठाकरे (उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे) मतदानाला आले नाहीत. तुमची तीन मतं आणखी वाढली असती. ठाकरे मतदानाला का येऊ शकले नाहीत?

मिलिंद नार्वेकर – नाही. नाही आले तरी काही हरकत नाहीये. उमेदवारी दिली म्हणूनच २२१ पर्यंत पोहोचू शकलो. ते फार महत्त्वाचं आहे.

प्रश्न – राजकारणात एकमेकांच्या विरोधात असणारे राजकारणी इथे एकत्र आलेत. लोकांकडून यावर टीका होतेय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

मिलिंद नार्वेकर – यावर पवार साहेब बोलतील.

प्रश्न – तुम्हाला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्वतःला काय काम करावंस वाटतं?

मिलिंद नार्वेकर – मला काय काम करायचं यापेक्षा अमोल काळे सांगतील, तेच मी काम करेन.

MCA Election 2022 : अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलच्या अमोल काळेंची बाजी; संदीप पाटील पराभूत

एमसीए निवडणूक : उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीची चर्चा

एमसीए निवडणुकीनिमित्तानं सत्ताधारी-विरोधक एकत्र आल्याचं दिसलं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदे गट, ठाकरे गटातील नेतेही निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्नेहभोजनावेळी शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर आले. मात्र, उद्धव ठाकरे कार्यक्रमाला अनुपस्थित होते. मात्र, ठाकरेंनी निवडणुकीच्या मतदानाकडे पाठ फिरवली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे मतदानासाठी गेलेच नाही. त्यामुळे ठाकरेंच्या अनुपस्थितीचे वेगवेगळे अर्थ लावले गेले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT