Mitchell Starc आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू! KKR ने किती कोटीला केले खरेदी?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mitchell starc becomes the most expensive player in the ipl history ipl auction 2024
mitchell starc becomes the most expensive player in the ipl history ipl auction 2024
social share
google news

Mitchell Starc most expensive cricketer IPL Auction 2024 Live Update :ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc)  आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata knight riders)  मिचेल स्टार्कला संघात घेतले आहेत. कोलकत्ताने मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. ही आतापर्यंतची आयपीएल इतिहासातली सर्वाधिक बोली आहे. त्यामुळे मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. (mitchell starc becomes the most expensive player in the ipl history ipl auction 2024)

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना कोलकात्याने खरेदी केले. मिचेल स्टार्क सात वर्षानंतर आयपीएलमध्ये खेळत आहे. याआधी तो आरसीबी संघाचा सदस्य राहिलाय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिचेल स्टार्कला संघात घेण्यासाठी चार संघामध्ये लढत झाली. दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. 10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले.

हे ही वाचा : छगन भुजबळ कुटुंबासह ‘त्या’ मोठ्या प्रकरणातून सुटले, कोर्टाने काय दिला निकाल?

पॅट कमिन्सने टाकलं मागे

आयपीएल लिलावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स  इतिहासातला सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. पॅट कमिन्स याची बेस प्राईज 2 कोटी होती. हैदराबाद, चेन्नई, बंगलोर यांच्यात त्याला संघात घेण्यासाठी चुरस रंगली होती. अखेर हैदराबादने त्याला 20 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केलं आहे. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात पॅट कमिन्स महागडा खेळाडू  ठरला होता.

ADVERTISEMENT

मात्र काही तासातच गेम पलटला आहे. पॅट कमिन्सला त्याचाच सहकारी मिचेल स्टार्कने मागे टाकले आहे. कोलकत्ताने मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. ही आतापर्यंतची आयपीएल इतिहासातली सर्वाधिक बोली आहे. त्यामुळे मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार लोकसभेतून निलंबित

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT