Ind vs NZ Test : न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारताला झुंजवलं, भारतीय गोलंदाज अपयशी
भारताच्या ३४५ धावांना उत्तर देताना न्यूझीलंडनेही पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दुसऱ्या दिवसाअखेरीस नाबाद अर्धशतकी खेळी करुन संघाची बाजू मजबुत केली आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता १२९ धावांपर्यंत मजल मारली आहे. लॅथम आणि यंग या दोन्ही सलामीवीरांनी सावध सुरुवात करुन दुसरं सत्र खेळून […]
ADVERTISEMENT

भारताच्या ३४५ धावांना उत्तर देताना न्यूझीलंडनेही पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दुसऱ्या दिवसाअखेरीस नाबाद अर्धशतकी खेळी करुन संघाची बाजू मजबुत केली आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता १२९ धावांपर्यंत मजल मारली आहे.
लॅथम आणि यंग या दोन्ही सलामीवीरांनी सावध सुरुवात करुन दुसरं सत्र खेळून काढलं. विकेट पडणार नाही. इशांत शर्मा आणि उमेश यादव या जोडीला दोन्ही फलंदाजांनी दाद दिली नाही हे पाहून कर्णधार अजिंक्य रहाणेने लवकरच स्पिनर्स बॉलर्सना संधी दिली. परंतू या दोन्ही फलंदाजांनी आश्विन, जाडेजा आणि पटेल या तिन्ही फिरकीपटूंना सावधतेने खेळून काढलं. विशेषकरुन विल यंगने काही सुरेख फटके खेळून आपलं अर्धशतक साजरं केलं.
विल यंग आक्रमक क्रिकेट खेळत असताना टॉम लॅथमने एक बाजू लावून धरली होती. मैदानावर स्थिरावल्यानंतर त्यानेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
Ind vs NZ : कानपूर मे आपका स्वागत है…गुटखा खाऊन मॅच पाहणारा चाहता सोशल मीडियावर व्हायरल










