Tokyo Olympic : खेळाडूंना पदकासोबत दिल्या जाणाऱ्या बुकेमधील ‘या’ फुलांना आहे विशेष महत्व
तब्बल ५ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूला तिच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने ४८ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली. पदक विजेत्या खेळाडूंना टोकियोमध्ये फुलांचा बुके आणि टोकियो ऑलिम्पिकचं मॅस्कॉट मिराईतोवा देण्यात येत आहे. इंडिया टुडेचे प्रतिनिधी राहुल रावत यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईशी संवाद साधून रौप्य पदकानंतर तिच्या […]
ADVERTISEMENT
तब्बल ५ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूला तिच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने ४८ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली. पदक विजेत्या खेळाडूंना टोकियोमध्ये फुलांचा बुके आणि टोकियो ऑलिम्पिकचं मॅस्कॉट मिराईतोवा देण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
इंडिया टुडेचे प्रतिनिधी राहुल रावत यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईशी संवाद साधून रौप्य पदकानंतर तिच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी राहुल यांनी मीराबाईला बुकेमध्ये दिल्या जाणाऱ्या फुलांचं महत्व समजावून सांगितलं. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बुकेमध्ये फुकीशीमा भागातील eustomas, Solomon’s seals फुलं, मियागी प्रांतातील सूर्यफुलं, Iwate भागातील gentians फुलं आणि टोकियो भागातील aspidistras या पानांचा समावेश आहे.
Rio मधील अपयशानंतर खेळ सोडण्याच्या विचारात होती Mirabai Chanu, Tokyo मध्ये पदक जिंकून स्वतःला केलं सिद्ध
हे वाचलं का?
टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बुकेमध्ये या तीन भागांची खास निवड करण्यात आली आहे कारण हे तीन भाग जपानमधील नैसर्गिंक आपत्तींना नेहमी तोंड देत असतात. परंतू अशा परिस्थितीतही या भागात ही फुलं चांगल्या पद्धतीने टिकवली जातात. ऑलिम्पिक वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बुकेमध्ये दिली जाणारी फुलं कोणत्याही खोलीत एसी शिवाय कित्येक दिवस ताजी टवटवीत राहू शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT