BCCI ची मोठी ऑफर नेहराने धुडकारली! राहुल द्रविडला पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदाची संधी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rahul dravid take over again head coach team india ashish nehra vvs laxman bcci offer
rahul dravid take over again head coach team india ashish nehra vvs laxman bcci offer
social share
google news

Rahul Dravid Team India Head Coach : वर्ल्ड कप फायनल संपल्यानंतर टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ संपला होता. राहुल द्रविड 2021 मध्ये भारताचे प्रशिक्षक झाले होते. त्यानंतर आता दोन वर्षांनी त्यांचा कार्यकाळ संपला आहे. आता टीम इंडियाचा नवीन हेड कोच कोण असणार आहे? अशी चर्चा सूरू झाली आहे. त्यात हेड कोच पदाच्या शर्यतीत माजी क्रिकेटर आशिष नेहरा (Ashish Nehara) आणि वीवीएस लक्ष्मण (vvs laxman) या दोन नावांची देखील चर्चा आहे. असे असले तरी बीसीसीआयने मात्र राहुल द्रविडला मोठी ऑफर दिली आहे. ही ऑफर नेमकी काय आहे, ती जाणून घेऊयात. (rahul dravid take over again head coach team india ashish nehra vvs laxman bcci offer)

क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवण्याची ऑफर दिली आहे. मात्र द्रविडने ही ऑफर स्विकारली आहे की नाही याची अद्याप पुष्टी झाली नाही आहे. रिपोर्टनुसार, राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवण्यासाठी बीसीसीआयशी गेल्याच आठवड्यात संपर्क देखील केला होता. त्यामुळे राहुल द्रविड ही ऑफर स्विकारेल अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा  : Datta Dalvi : ठाकरेंच्या नेत्याला घरातून अटक, शिंदेंवर काय केली होती टीका?

बीसीसीआय द्रविडला टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत ठेवू इच्छित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, गेल्या दोन वर्षांत राहुल द्रविडने तयार केलेल्या टीम इंडियाच्या सेटअपमध्ये सातत्य आवश्यक आहे. नवीन मुख्य प्रशिक्षक आल्यास या गोष्टीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल द्रविडला कायम ठेवण्याचा विचार सूरू आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आशिष नेहरा मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या टी20 फॉरमॅटच्या कोच पदासाठी आशिष नेहराशी संपर्क करण्यात आला होता. मात्र त्याने बीसीसीआयचा हा प्रस्ताव नाकारल्याचे समजते. तर सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी20 मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण तात्पुरत्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेनंतर भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्यात तात्पुरताच व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक राहतो का हे पाहावे लागेल.

हे ही वाचा  : Nagpur Crime : IAS, IPS होण्याचं होतं स्वप्न, पण…; अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

दरम्यान राहुल द्रविड जर हा प्रस्ताव स्वीकारतो तर त्याच्या दुसऱ्या कार्यकाळातील त्याची पहिली नियुक्ती भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा असेल, जो 10 डिसेंबरपासून सुरू होईल. तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. त्यात सेंच्युरियन (26 डिसेंबरपासून) आणि केपटाऊन (3 जानेवारीपासून) येथे दोन कसोटी सामने होतील. आता राहुल द्रविड बीसीसीआयची ही ऑफऱ स्विकारतो का? आणि मुख्य प्रशिक्षकाची दुसरी टर्म स्विकारतो का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT