Team India : रवी बिश्नोईने राशिदला टाकलं मागे, टी20 रँकिंगमध्ये कितव्या स्थानी?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ravi bishnoi becomes world no1 bowler icc t20 ranking ruturaj gaikwad ind vs aus t20 series
ravi bishnoi becomes world no1 bowler icc t20 ranking ruturaj gaikwad ind vs aus t20 series
social share
google news

Ravi Bishnoi ICC T20 Ranking : टीम इंडियाचा युवा फिरकीपटू रवि बिश्नोईने (Ravi Bishnoi)  आयसीसीच्या टी20 रॅकिंगमध्ये (ICC T20 Ranking) मानाचे स्थान मिळवले आहे. टी20 रॅकिंगमध्ये रवि बिश्नोई आता पहिल्या स्थानी पोहोचला आहे. बिश्नोईने अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज राशिद खानला (Rashid Khan) पछाडत हा क्रमांक पटकावला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी20 मालिकेत केलेल्या कामगिरीचा त्याला फायदा झाला आहे. तसेच बिश्नाईसोबत टीम इंडियाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (ruturaj Gaikwad) टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. (ravi bishnoi becomes world no1 bowler icc t20 ranking ruturaj gaikwad ind vs aus t20 series)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी20 सीरीजमधील दर्जेदार कामगिरीचा खेळाडूंना फायदा झाला आहे. टी20 रॅकिंगमध्ये रवि बिश्नोईने आता पहिले स्थान गाठले आहे. बिश्नोई 699 पॉईंट्स आयसीसीच्या गोलंदाजीच्या रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. याआधी 665 पॉईंट्स सह बिश्नाई पाचव्या स्थानी होता. बिश्नाई सोबत फलंदाजीच्या रॅकिंगमध्ये ऋतुराज गायकवाड 7 व्या स्थानी आहे. तर याच रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानी 855 गुणांसब सुर्यकुमार यादव पहिल्या स्थानी आहे. तर 787 गुणांसह मोहम्मद रिझवान दुसऱ्या स्थानी आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : “फडणवीस सरकारने मराठा…”, संभाजीराजेंचं खासदारांना पत्र, लढा होणार तीव्र?

ऑलराऊंडर खेळाडूंच्या रँकिंगमध्येही 127 पॉइंट्ससह अक्षर पटेल 14 व्या स्थानी आहे. याआधी अक्षर पटेल टॉप 20 मध्ये नव्हता. मात्र आता त्याने कामगिरीत सुधारणा करुन टॉप 20 त स्थान पटकावले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरूद्ध 5 टी20 सिरीजबद्दल बोलायचं झालं तर ऋतुराज गायकवाड आणि रवि बिश्नाईने कमालीची कामगिरी केली आहे. गायकवाडने या सीरीजमध्ये सर्वांधिक धावा केल्या आहेत. गायकवाडने 5 सामन्यात 223 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने एक शतकही ठोकलं आहे. तसचे बिश्नोईच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने पाच सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच बिश्नोईने रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. तसेच तो T20 मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अक्षर पटेलसाठीही ही सीरीज खुप चांगली राहिली आहे. पटेलने 5 सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या.

हे ही वाचा : Nalasopara Crime : ‘शेंबड्या’ म्हणत चिडवलं, 8 वर्षाच्या मुलीचा ‘त्याने’ जीवच घेतला

रवी बिश्नोईच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर या गोलंदाजाने 1 वनडे, 21 टी-20 आणि 52 आयपीएल सामने खेळले आहेत. या गोलंदाजाने एकदिवसीय सामन्यात 1 बळी, टी-20मध्ये 34 बळी आणि आयपीएलमध्ये एकूण 53 बळी घेतले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT