Team India's T20 WC Squad : टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, संजू-पंतसह संघात कुणाला मिळाली संधी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

t20 world cup 2024 team india squad announce rohit sharma hardik pandya rishabh pant complete list
टीम इंडियाच्या संघात नेमकी कोणत्या कोणत्या खेळाडूला संधी मिळाली आहे?
social share
google news

T20 World Cup 2024, Team india Squad : टी20  वर्ल्डकप 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात नवख्या खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे. हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. एकूण 19 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात. 
(t20 world cup 2024 team india squad announce rohit sharma hardik pandya rishabh pant complete list) 

टी20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर हार्दिक पंड्या उपकर्णधार असणार आहे. तर संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय मिस्टर 360 डिग्री सुर्यकुमार यादव यांची देखील संघात निवड झाली आहे. तसेच शिवम दुबे, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल अशा तीन ऑलराऊंडर खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे. 

हे ही वाचा :मोदींच्या 'भटकती आत्मा'वरून पवार भडकले

जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज या गोलंदाजांची देखील टी20 संघात निवड झाली आहे. शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान या चार खेळाडूंना रिझर्व खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टी20 साठी भारतीय संघ : 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उप कर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (विकेटकिपर), मोहम्मद सिराज 

रिझर्व खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mumbai North Central : "वर्षाताई, स्वतःचा बळी द्यायला का तयार झाल्या?"

टी20 वर्ल्ड कप ग्रुप : 

ग्रुप ए : भारत, पाकिस्तान, आयरलँड, कनाडा, यूएसए.
ग्रुप बी : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामीबीया,स्कॉटलँड, ओमान
ग्रुप सी : न्युझीलंड, वेस्टइंडीज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ग्रुप डी :  साऊथ आफ्रिका, श्रीलंका, बांग्लादेश, नीदरलँड, नेपाल 

ADVERTISEMENT

दरम्यान आता जवळपास महिन्याभरानंतर म्हणजेच 2  जूनला या स्पर्धेला सुरूवात होणार आहे.या वर्ल्ड कपचा अंतिम सामना 29 जून 2024 ला खेळवला जाणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT