Odi World Cup : ‘हा माझा शेवटचा वर्ल्ड कप’, टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला देशात सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी सर्व संघांचे सराव सामने सुरू आहेत. या सराव सामन्या दरम्यान टीम इंडियाच्या स्टार अनुभवी स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
ADVERTISEMENT
Ravichandran Ashwin hints Retirement : अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर सध्या वनडे वर्ल्ड कप (odi world cup 2023) पोहोचलाय. येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला देशात सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी सर्व संघांचे सराव सामने सुरू आहेत. या सराव सामन्या दरम्यान टीम इंडियाच्या स्टार अनुभवी स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे अश्विनला सुरूवातीला टीम इंडियाच्या वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र शेवटच्या क्षणी त्याचं नशीब चमकलं आणि दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागी त्याला संघात संधी मिळाली. आता या संधीचे अश्विनला सोने करता येते का? हे पाहावे लागणार आहे. (ravichandran ashwin hints retirement this can be last world cip before odi world cup 2023 ind vs eng)
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा पहिला सराव सामना इंग्लंड विरूद्द शनिवारी होणार होता. या सामन्याचे टॉस जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा देखील निर्णय़ घेतला होता. मात्र पावसामुळे हा सराव सामना रद्द करण्यात आला होता. या सराव सामन्याच्या सुरूवातीला रविचंद्रन अश्विनने स्टार स्पोर्टसशी बातचीत केली होती.या दरम्यान रविचंद्रन अश्विनने मोठं विधान केले होते.
हे ही वाचा : शिवाजी महाराज वाघनखे : लंडनच्या संग्रहालयातील ‘ती’ वाघनखं खरी की खोटी, वाद काय?
निवृत्तीवर काय म्हणाला?
मी चांगल्या लयीत आहे आणि मला स्पर्धेचा आनंद उचलायचा आहे. भारतासाठी हा माझा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो, असे विधान करून रविचंद्रन अश्विनने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. शेवटचा वर्ल्ड कप असल्याने या स्पर्धेचा आनंद घेणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.
हे वाचलं का?
टीममध्ये अचानक झालेल्या सिलेक्शनवर अश्विन म्हणतो, आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेले आहे. खरे सांगायचे तर वर्ल्डकपमध्ये
संघासोबत उपस्थित राहीन असे वाटले देखील नव्हते. परिस्थितीने खात्री दिली आणि त्यामुळे आज मी येथे आहे, संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्माने माझ्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचेही अश्विनने पुढे म्हटले.
वर्ल्ड कपमधील अश्विनचे प्रदर्शन
रविचंद्रन अश्विनने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी 10 सामने खेळले असून त्याचा शेवटचा सामना 2015 मध्ये होता. यामध्ये त्याने 24.88 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत. 25 धावांत चार बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. विशेष बाब म्हणजे विराट कोहली व्यतिरिक्त अश्विन हा सध्याच्या भारतीय संघाचा एकमेव सदस्य आहे जो 2011 मध्ये विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अजित पवार-छगन भुजबळांमध्ये शिंदेंसमोरच ‘जुपंली’; ‘त्या’ बैठकीत काय घडलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT