WPL 2024 Final : दुष्काळ संपला, सांगलीच्या स्मृती मंधानाने पूर्ण केलं RCB चं स्वप्न!
DC vs RCB WPL Final : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) ८ गडी राखून पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने पटकावले विजेतेपद

आयपीएल जिंकण्याचे आरसीबीचे स्वप्न महिला संघाने केले पूर्ण

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील संघाची उत्कृष्ट कामगिरी
Rcb Won IPL 2024 Women : अखेर प्रतीक्षा संपली. गेल्या 16 वर्षांपासून आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याचे बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या चाहत्यांचे स्वप्न पूर्ण झाले. सांगलीच्या स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 चे विजेतेपद पटकावले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) ८ गडी राखून पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. (RCB won the IPL 2024 title by defeating Delhi Capitals (DC) by 8 wickets)
या सामन्यात आरसीबीसमोर 114 धावांचे लक्ष्य होते, जे 2 गडी गमावून केवळ 19.3 षटकात पूर्ण केले. संघाकडून एलिस पेरीने नाबाद 35, सोफी डिव्हाईनने 32 आणि स्मृती मंधानाने 31 धावा केल्या.
शिखा पांडे आणि मीनू मणी यांनी 1-1 विकेट घेतली. डब्ल्यूपीएलचा हा दुसरा हंगाम होता, जो आरसीबीने जिंकला आहे. मुंबई इंडियन्स (MI) पहिल्या सत्रात चॅम्पियन ठरला. दोन्ही वेळा दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
पुरुष संघाला अजूनही जिंकता आलेले नाही विजेतेपद
दुसरीकडे, आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 हंगाम झाले आहेत आणि आरसीबी पुरुष संघाने एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. अशावेळी महिला संघाने केलेल्या या कामगिरीने विराट कोहली आणि पुरुष संघावरील दडपण वाढणार आहे.