क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, दुर्घटनेत पंतला गंभीर दुखापत
भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा भयंकर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रुडकीवरून परताना गुरुकुल नारसन परिसरात ऋषभ पंतची कार दुर्घटनाग्रस्त झाली. अपघाताचे काही फोटो समोर आले असून, ऋषभ पंतला गंभीर जखमा झालेल्या दिसत आहेत. (rishabh pant injured in car accident in delhi) 25 वर्षीय क्रिकेटपटू ऋषभ पंत […]
ADVERTISEMENT
भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा भयंकर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रुडकीवरून परताना गुरुकुल नारसन परिसरात ऋषभ पंतची कार दुर्घटनाग्रस्त झाली. अपघाताचे काही फोटो समोर आले असून, ऋषभ पंतला गंभीर जखमा झालेल्या दिसत आहेत. (rishabh pant injured in car accident in delhi)
ADVERTISEMENT
25 वर्षीय क्रिकेटपटू ऋषभ पंत सकाळी 5.15 वाजता दिल्लीवरून परत रुडकीला चालला होता. बीएमडब्ल्यू कारने जात असताना नारसन सीमेजवळ हा अपघात घडला. ऋषभ पंतची कार रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. कार वेगात असल्यानं भीषण अपघात घडला.
अपघात झाला त्यावेळी कारमध्ये ऋषभ पंत एकटाच होता. अपघातानंतर काच तोडून तो बाहेर पडला. कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे ऋषभवर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
हे वाचलं का?
पंतला सुट्टी, राहुलचं उपकर्णधार पद काढून निवड समितीने काय दिला मेसेज?
ऋषभ पंतची कार जळून खाक
दरम्यान, अपघातानंतर ऋषभ पंतच्या बीएमडब्ल्यू कारने पेट घेतला. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ऋषभ पंतचे अपघातानंतरचे काही फोटो समोर आले आहेत. त्याचबरोबर पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही फोटो व्हायरल झाले आहेत. कार अपघातात ऋषभ पंतच्या शरीरावर गंभीर जखमा झालेल्या आहेत. ऋषभ पंतला देहरादूनला उपचारासाठी हलवण्यात येणार आहे.
Rohit sharma: रोहितची कॅप्टन्सी कायमची गेली का?; आकडेवारी काय सांगते?
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून ऋषभ पंतला सुट्टी
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला. जानेवारीपासून भारत विरुद्ध श्रीलंका मालिका होत आहे. टी 20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकांमधून ऋषभ पंतला वगळण्यात आलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT