Rishabh Pant : ‘मला वाटलं माझी वेळ संपली’, ऋषभ पंतने कार अपघाताचा सांगितला भयानक अनुभव

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rishabh pant tell horrific car accident story star sport team india cricket ind vs eng
rishabh pant tell horrific car accident story star sport team india cricket ind vs eng
social share
google news

Rishabh Pant On Horrific Car Accident : टीम इंडियाचा विकेटकिपर, फलंदाज ऋषभ पंत आता कुठे कार अपघातातून सावरला आहे. कार अपघातानंतर तो तब्बल अनेक वर्ष क्रिकेटपासून दुर होता. आता कुठे त्याने मैदानात वापसी केली आहे. या दरम्यान पहिल्यांदाच त्या भीषण कार अपघातावर ऋषभ पंतने भाष्य केले आहे. यावेळी ऋषभ पंतने कार अपघाताचा तो भयानक प्रसंग सांगितला आहे. नेमका तो अपघाताचा प्रसंग कसा होता? आणि या अपघातातून तो कसा सावरला? हे जाणून घेऊय़ात. (rishabh pant tell horrific car accident story star sport team india cricket ind vs eng)

ऋषभ पंतने स्टार स्पोर्टला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ऋषभ पंतने त्या भीषण अपघाताचा अनुभव सांगितला आहे. ‘जीवनात पहिल्यांदाच मला अस वाटलं की या जगातील माझी वेळ संपली आहे’. तसेच ज्यावेळेस मला अपघात झाला होता, त्यावेळी मला किती दुखापत झाली आहे, याची मला माहिती होती. पण मी भाग्यशाली होतो, कारण ही दुखापत आणखीण गंभीर होऊ शकली असती,असे देखील ऋषभ पंत सांगतो.

हे ही वाचा :  Manoj jarange : ‘थेट कोर्टात भेटू’, ठाकरेंच्या नेत्याचं जरांगेंना आव्हान

मला वाटत होतं की मला कुणी या अपघातातून वाचवले आहे. त्यावेळेस मी डॉक्टरांना विचारले की, मला बरं व्हायला किती वेळ लागेल, त्यावेळेत ते म्हणाले, 16 ते 18 महिने लागतील. तसेच मला माहितीच होतं या अपघातातून सावरण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतील, असे ऋषभ पंत सांगतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कसा झाला होता अपघात?

दरम्यान ऋषभ पंत त्याच्या घरी जात असताना रूडकीजवळ त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. ऋषभ पंतची गाडी डिवायडरला धडकली होती. त्यानंतर त्याच्या गाडीने पेट घेतला होता. गाडीला अपघात झाल्यानंतर ऋषभ पंत बाहेर पडल्याने तो अपघातातून बचावला होता. या अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला होता आणि कपाळावर दोन जखमा झाल्या होत्या. ही घटना 30 डिसेंबर 2022 रोजी घडली होती.

हे ही वाचा : Maratha Reservation: भुजबळांचा CM शिंदेंना टोला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेवरून काय म्हणाले?

पंतची कारकीर्द

ऋषभ पंतने आतापर्यंत 33 कसोटी सामन्यांमध्ये 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत ज्यात 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांच्या मदतीने 987 धावा केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय बद्दल बोलायचे तर, पंतने 30 सामन्यांमध्ये 34.60 च्या सरासरीने 865 धावा (1 शतक, 5 अर्धशतके) केल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT