IND vs BAN: संपूर्ण क्रिकेटविश्वात फक्त रोहित शर्माचीच चर्चा! 'असा' वर्ल्ड रेकॉर्ड करणारा जगातील एकमेव फलंदाज
Rohit Sharma World Record In Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. कानपूर टेस्टमध्ये भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये रोहितला 11 चेंडूत 23 धावाच करता आल्या. पण रोहितची ही छोट्याशा वेगवान खेळीने चक्क विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कानपूरच्या मैदानात रोहित शर्माने रचला इतिहास
रोहित शर्माच्या नावावर सर्वात मोठ्या विक्रमाची नोंद
'असा' कारनामा करणारा ठरला जगातील एकमेव फलंदाज
Rohit Sharma World Record In Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. कानपूर टेस्टमध्ये भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये रोहितला 11 चेंडूत 23 धावाच करता आल्या. पण रोहितची ही छोट्याशा वेगवान खेळीने चक्क विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. रोहितने त्याच्या 23 धावांच्या खेळीत एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. उल्लेखनीय बाब म्हणजे रोहितने त्याच्या इनिंगच्या पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकला. खालिल अहमदच्या सुरुवातीच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारले. (Rohit Sharma has created history And Makes World Record In Test Cricket. In the first innings of India's Kanpur Test, Rohit Scored 23 runs off 11 balls)
या कसोटी सामन्यात अशी कामगिरी करून हिटमॅन जागतिक क्रिकेटमधील चौथा फलंदाज बनला आहे, ज्याच्या नावावर पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. रोहितच्या आधी वेस्टइंडिजचा माजी फलंदाज ईएवी फोफी विलियम्सने वर्ष 1947/48 मध्ये इंग्लंडच्या विरोधात असा कारनामा केला होता. त्याने नंबर 7 वर फलंदाजी करून गोलंदाज जिम लेकरला धू धू धुतलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकरने वर्ष 2012/13 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई टेस्ट मध्ये नंबर 4 वर फलंदाजी केली होती. त्या सामन्यात सचिनने पहिल्या दोन चेंडुवर षटकार ठोकले होते.
हे ही वाचा >> Video: 'स्पायडर मॅन'! रोहित शर्माने घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वात कठीण झेल, कोहली-सिराज पाहतच राहिला
भारताच्या उमेश यादवने वर्ष 2019/20 मध्ये रांचीत दक्षिण आफ्रिके विरोधात झालेल्या टेस्टमध्ये 9 नंबरवर फलंदाजी करून पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकला होता. आता रोहित शर्माने अशी चमकदार कामगिरी केली आहे. रोहितने बांगलादेश विरुद्ध कानपूर टेस्टमध्ये इनिंगच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार मारले. रोहितने सलामीचा फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
रोहित शर्माच्या इनिंगच्या पहिल्या दोन चेंडुंवर षटकार मारणारा जगातील पहिला सलामीचा फलंदाज बनला आहे. खालिल अहमदच्या सलग दोन चेंडूंवर षटकार मारण्याचा कारनामा रोहितने केला आहे. रोहित 23 धावा करून बाद झाला. पण रोहितच्या इनिंगने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. रोहित शर्माने बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 11 चेंडूंवर 23 धावांची खेळी केली.
हे ही वाचा >> IND vs BAN: भारताच्या फलंदाजांचा धमाका! 147 वर्षात कोणत्याच संघाला जमलं नाही, पाकिस्तानचाही विक्रम मोडला
या आक्रमक खेळीत रोहितने 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले. रोहितने आता वर्ष 2023 च्या सर्व फॉर्मेटमध्ये 41 षटकार ठोकले आहेत. रोहितने अशी कामगिरी करून कर्णधार म्हणून एक विक्रमही नोंदवला आहे. रोहित शर्मा जागतिक क्रिकेटमधील एकमेव कर्णधार बनला आहे, ज्याच्या नावावर तीनवेळा एका कॅलेंडर ईयरमध्ये 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय षटकारांची नोंद आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT