Rohit Sharma Video  : "नेहमी काही ना काही...", भारत जिंकला पण रोहित शर्माच्या प्रतिक्रियेमुळं खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rohit Sharma Video
Rohit Sharma Press Conference
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय

point

कर्णधार रोहित शर्माने दिली मोठी प्रतिक्रिया

point

रोहित शर्माचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Rohit Sharma Press Conference : बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने बांगालदेशचा 280 धावांनी पराभव करून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पहिल्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. टीम इंडियाने पहिल्या डावात 376 धावा केल्या  होत्या.

ADVERTISEMENT

तर बांगलादेशने पहिल्या डावात फक्त 149 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 227 धावांचं लीड मिळालं. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाने 287 धावा करून बांगलादेशसमोर एकूण 515 धावांचं आव्हान ठेवलं. परंतु, बांगलादेशच्या संघाने अवघ्या 234 धावा केल्यानं टीम इंडियाने 280 धावांनी कसोटी सामना खिशात घातला. (Team India won in the first test match against Bangladesh. Team India defeated Bangladesh by 280 runs and took the lead in both the test matches)

टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने दिली मोठी प्रतिक्रिया

माध्यमांना प्रतिक्रिया देताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "'पुढे काय होणार आहे, हे पाहण्यासाठी एक जबरस्त रिझल्ट होता. आम्ही मोठ्या विश्रांतीनंतर खेळत आहोत. पण तुम्ही क्रिकेटपासून कधीही वेगळे होत नाहीत. आम्ही एक आठवड्यापूर्वी इथे आलो होतो. पंत शतकीय कामगिरीवर रोहित म्हणाला, तो खूप कठीण काळातून गेला आहे. ज्या प्रकारे त्याने स्वत:ला सांभाळलं आहे, हे प्रेरणादायी आहे. त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केलं. त्यानंतर वर्ल्डकपमध्ये यश मिळालं. हा त्याचा सर्वात आवडता फॉर्मेट आहे. त्याल हे सर्व श्रेय दिलं पाहिजे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेची रक्कम वाढणार, फक्त...

 परिस्थिती कशीही असो, आम्हाला टीम बनवायची आहे. तुम्हाला खेळाडूंना श्रेय द्यावे लागेल. लाल मातीची खेळपट्टी काही ना काही देत असते. तुम्हाला थोडा धीर ठेवावा लागेल. या खेळपट्टीवर आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून प्रतीस्पर्धी संघावर दबाव टाकला. रोहित अश्विनबाबत बोलताना म्हणाला, तो नेहमी गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून आमच्यासाठी सज्ज असतो. तो कधीही खेळापासून वेगळा राहत नाही."

विराट कोहलीचा 'तो' व्हिडीओत होतोय व्हायरल

बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये विजयाचा जल्लोष असतानाच विराट कोहलीच्या नागिन डान्सचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल झाला आहे. मैदानात डीजेचा धमाका सुरु होताच अनेक खेळाडूंना नाचण्याची इच्छा होते. पण विराट कोहली त्याच्या हटके अदांमुळे नेहमीच चर्चेत येतो. आताही विराटच्या नागिन डान्सने संपूर्ण क्रिडाविश्वात हशा पिकवला आहे. बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना विराटने हा डान्स करुन तमाम क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन केलं आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Raj Thackeray : "तो सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही", लोकप्रिय अभिनेत्याला इशारा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT