Ind vs NZ: रोहितलाही वाटलं असेल, माझ्यात गुणवत्ता नाही, संघातील बदलांवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रीया
न्यूझीलंडविरुद्ध सामना गमावलेल्या टीम इंडियावर सध्या चहुबाजूंनी टीकेचा वर्षाव होतो आहे. भारतीय संघाने या सामन्यात दोन महत्वाचे बदल केले. इशान किशन आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. इशान किशनला स्थान देण्यात आल्यामुळे अनेकांनी रोहित आणि इशान हे सलामीला फलंदाजीसाठी येतील असा अंदाज बांधला होता. परंतू कोहली आणि टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने इशान किशन आणि लोकेश राहुल […]
ADVERTISEMENT

न्यूझीलंडविरुद्ध सामना गमावलेल्या टीम इंडियावर सध्या चहुबाजूंनी टीकेचा वर्षाव होतो आहे. भारतीय संघाने या सामन्यात दोन महत्वाचे बदल केले. इशान किशन आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. इशान किशनला स्थान देण्यात आल्यामुळे अनेकांनी रोहित आणि इशान हे सलामीला फलंदाजीसाठी येतील असा अंदाज बांधला होता.
परंतू कोहली आणि टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने इशान किशन आणि लोकेश राहुल यांना सलामीला पाठवत सर्वांना धक्का दिला.
T20 World Cup : सेमी फायनलसाठी टीम इंडिया अजुनही शर्यतीत, ही आहेत समीकरणं
टीम इंडियाची ही रणनिती चांगलीच फसली. इशान किशन, लोकेश राहुल, रोहित शर्मा हे सर्व फलंदाज न्यूझीलंड गोलंदाजांच्या जाळ्यात अलगद अडकले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघाच्या या बदलांवर टीका केली आहे.