PAK vs BAN: "ये खांद्यावरून हात..."; पाकिस्तानच्या संघात पडली वादाची ठिणगी? तो VIDEO व्हायरल
Shaheen Afridi vs Shaan Mashood Video Viral : बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा १० विकेट्सने पराभव करून इतिहास रचला. बांगलादेश विरुद्ध झालेल्या या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या संघाची पूरती दाणादाण उडाली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बांगलादेशने पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ
शाहीन आफ्रिदी-शान मसुदचा व्हायरल व्हिडीओनं खळबळ
पाकिस्तानच्या संघात घडलंय तरी काय?
Shaheen Afridi vs Shaan Mashood Video Viral : बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा १० विकेट्सने पराभव करून इतिहास रचला. बांगलादेश विरुद्ध झालेल्या या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या संघाची पूरती दाणादाण उडाली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली आहे. या विजयामुळं दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तान विरुद्ध १-० ने आघाडी घेतली आहे. या कसोटी मालिकेतील दुसरा निर्णायक सामना ३० ऑगस्टला होणार आहे. परंतु, रावळपिंडी येथे झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या संघात वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. (Bangladesh created history by defeating Pakistan by 10 wickets in the first Test match. In this test match against Bangladesh, Pakistan's team's support was thrown into disarray)
पाकिस्तानच्या संघाचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
सामना संपल्यानंतर शान मसूद आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यात वाद झाल्याची चर्चा रंगली आहे. दोन्ही खेळाडू हर्डलमध्ये उभे असताना शाहीनने पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदचा हात बाजूला केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानं पाकिस्तानच्या संघाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
हे ही वाचा >> Aaditya Thackeray: "वामन म्हात्रेंना..."; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून आदित्य ठाकरे संतापले
पाकिस्तान विरुद्ध झालेल्या या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भरारी घेतली आहे. कारण बांगलादेशने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून सहाव्या स्थानावर उडी घेतली आहे. तसच श्रीलंकेचा संघही ४० गुणांमुळं या क्रमवारीत बरोबरीत आला आहे. तर पाकिस्तान ३०.५६ गुणांमुळे आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार ४००० रुपये? CM शिंदेंनी ठेवली एक अट
पाकिस्तानचा संघ सातत्याने चुका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आशिया चषक २०२३, वनडे वर्ल्डकप २०२३, टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्येही पाकिस्तानला घवघवीत यश मिळवता आलं नाही. आता बांगलादेशने पाकिस्तानचा पहिल्या कसोटी सामन्यात मोठा पराभव करुन ऐतिहासिक कामगिरी केली. बांगलादेशने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानचा पहिल्यांदाच पराभव केला. पाकिस्तानचा घरच्या मैदानावर पराभवाची धूळ चाखावी लागल्यानं संघातही काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT