Suryakumar Yadav: 'तो कॅच बसला हातात..', सूर्यकुमारने मराठीतून सांगितला 'त्या' कॅचचा नेमका किस्सा!

रोहित गोळे

Suryakumar Yadav Catch: सूर्यकुमार यादव याने टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जो ऐतिहासिक कॅच घेतला त्याबाबत मराठीतून नेमका किस्सा सांगितला आहे.

ADVERTISEMENT

सूर्यकुमारने मराठीतून सांगितला कॅचचा किस्सा
सूर्यकुमारने मराठीतून सांगितला कॅचचा किस्सा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूर्यकुमार यादवचं मराठीतून भाषण

point

फायनलमध्ये कसा घेतला कॅच त्याचा नेमका किस्सा

point

विधीमंडळात सूर्यकुमारचा खास सत्कार

Suryakumar Yadav Marathi Speech: मुंबई: टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचं काल (4 जुलै) मुंबईत अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आज (5 जुलै) महाराष्ट्र सरकारच्या वतीने टीम इंडियामधील मुंबईतील खेळाडूंसाठी खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. याच सोहळ्यात सूर्यकुमार यादवने टी-20 च्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कॅच कसा घेतला याबाबत नेमका किस्सा सांगितला. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील मुंबईचे इतर खेळाडू यांचा विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने 11 कोटींचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं. याच कार्यक्रमात सूर्यकुमार यादवने मराठीतून भाषण केलं. 

दरम्यान, सूर्यकुमार यादव जेव्हा भाषण करत होता तेव्हा सभागृहातील अनेकांनी त्याला कॅच, कॅच असं ओरडून त्या ऐतिहासिक कॅचची आठवण दिली. तेव्हा सूर्यकुमार म्हणाला की, 'तो कॅच हातात बसला..'

'तो कॅच बसला हातात..', पाहा विधीमंडळात सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला.. 

'जे मी काल पाहिलंय ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि आताही जे मी पाहतोय ते देखील मी कधीच विसरू शकत नाही.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp