World Cup 2023 नंतर सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड होणार कर्णधार?
suryakumar yadav ruturaj gaikwad : वर्ल्ड कप 2023 नंतर सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड बनू शकतात टीम इंडियाच्या टी-20 संघाचे कर्णधार, समजून घ्या संपूर्ण प्रकरण…
ADVERTISEMENT
T20 Series India vs Australia 2023 : सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मोठा झटका बसला. उपकर्णधार हार्दिक पंड्या जखमी झाला आणि त्याला महत्त्वाच्या स्पर्धेला मुकावं लागलं. आता हार्दिक जायबंदी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या कर्णधार पदाची सूत्र सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाडकडे जाऊ शकतात. कारण जायबंदी झाल्यामुळे हार्दिक पंड्या २३ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत वापसी करण्याची शक्यता नाही. (India’s captain for the five-match T20 series against Australia after the World Cup can be given to Suryakumar Yadav or Ruturaj Gaikwad. Because Hardik Pandya may not be able to return in the series.)
ADVERTISEMENT
बीसीसीआय सूत्राच्या हवाल्याने पीटीआय वृत्तसंस्थेने एक वृत्त दिले आहे. पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे की, हार्दिक पंड्याच्या लिगामेंटला दुखापत झाली आहे. आता तो 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या टी-20 सामन्यासाठी फिट होऊ शकतो. सूत्रांनी सांगितले की, हार्दिकला फीट होण्यासाठी आणि निवडीसाठी उपलब्ध होण्यासाठी काही काळ आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात डरबनमध्ये सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी तो टीम इंडियात पुनरागमन करेल, असे मानले जात आहे. तोपर्यंत तो फीट पूर्णपणे फीट होईल, मात्र या प्रकरणाचा अंतिम निर्णय एनसीएची क्रीडा विज्ञान टीम घेईल.
हे ही वाचा >> ICC Odi Ranking 2023: शुभमन गिलने बाबरला पछाडलं! बनला वर्ल्ड नंबर 1 बॅटसमन
उपांत्य फेरीनंतर टीम इंडियाची होणार घोषणा
एकीकडे हार्दिक दुखापतग्रस्त झाल आहे, तर दुसरीकडे विश्वचषकानंतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. त्यामुळे मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा विश्वचषक उपांत्य फेरीनंतर केली जाऊ शकते. टीम इंडिया 15 नोव्हेंबरला वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल सामना खेळणार आहे.
हे वाचलं का?
सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड… कोण होणार कर्णधार?
हार्दिक पंड्या खेळू शकणार नसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधारपदाच्या शर्यतीत ऋतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमार यादव यांची नावे आहेत. दोघांपैकी एकाला कर्णधार बनवले जाऊ शकते. ही माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, जर सूर्यकुमार यादवने विश्वचषक खेळल्यानंतर विश्रांतीची मागणी केली नाही, तर तो टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. अन्यथा, त्याच्या जागी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा ऋतुराज गायकवाड पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत दिसू शकतो.
हे ही वाचा >> Angelo Mathews बॅटिंग न करताच झाला बाद, इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘टाइम आऊट’
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका कधी होणार सुरू?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसन, इशान किशन आणि युझवेंद्र चहलसह रियान पराग यांच्या नावाचीही चर्चा होऊ शकते. कारण रियान परागने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 510 धावा आणि 11 विकेट घेतल्या आहेत. 23 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला टी-20 सामना होणार आहे. तर शेवटचा आणि पाचवा टी-२० सामना ३ डिसेंबरला होणार आहे. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दीर्घ दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT