T-20 World Cup : पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव का झाला? जाणून घ्या कारणं..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युएईत सुरु झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. १५२ धावांचं आव्हान कर्णधार बाबर आझम आणि त्याचा सहकारी मोहम्मद रिझवानने सहज पूर्ण केलं.

ADVERTISEMENT

टी-२० विश्वचषक असो किंवा वन-डे वर्ल्डकप भारताने आतापर्यंत प्रत्येकवेळी पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. परंतू या सामन्यात पहिल्या क्षणापासून पाकिस्तानचं वर्चस्व पहायला मिळालं. असं काय झालं की भारताला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला, याची कारणं आज शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

१) टॉस गमावला आणि भारताने तिकडेच कच खाल्ली –

हे वाचलं का?

नाणेफेकीचा कौल हा बाबर आझमच्या बाजुने लागला आणि त्याने क्षणाचाही विचार न करता बॉलिंगचा निर्णय घेतला. युएईतल्या मैदानांवर रात्री पडणारं दव हे संघांसाठी धोकादायक ठरु शकतं. ज्याचा फायदा पाकिस्तानला बरोब्बर मिळाला. टॉस जिंकणं हे कोणाच्याही हातात नसतं त्यामुळे यासाठी भारताला दोष देता येणार नाही. परंतू टॉस गमावल्यानंतरच भारतीय खेळाडूंची देहबोली दडपणाखाली जाणवली.

२) ओपनर्सची निराशाजनक सुरुवात –

ADVERTISEMENT

रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव हे तिन्ही बिनीचे शिलेदार स्वस्तात माघारी परतले हे भारतीय संघाच्या पराभवाचं आणखी एक महत्वाचं कारणं ठरलं. रोहित आणि लोकेश राहुलला शाहिन आफ्रिदीने आपल्या भन्नाट बॉलिंगच्या जाळ्यात अडकवलं, तर सूर्यकुमार यादव हसन अलीच्या बॉलिंगवर बाद झाला. ज्या सामन्यात सुरुवात चांगली करणं गरजेचं असतं तिकडेच टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. ३ बाद ३१ या परिस्थितीतून संघ नंतर सावरुच शकला नाही.

ADVERTISEMENT

T20 World Cup : किंग कोहलीची कॅप्टन्स इनिंग, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात विक्रमी अर्धशतकी खेळी

३) पंत-जाडेजाची बेजबाबदार फलंदाजी –

ऋषभ पंतने मधल्या षटकांमध्ये कॅप्टन विराट कोहलीची उत्तम साथ देत चांगली इनिंग खेळली. हसन अलीवर विशेष आक्रमण करत पंतने काही सुरेख फटकेही खेळले. परंतू कोहली-पंतची पार्टनरशीप रंगात आलेली असताना विनाकारण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पंतने आपली विकेट फेकली. त्याक्षणी भारतीय संघाला पंतकडून समजूतदार इनिंगची आवश्यकता होती. परंतू मोक्याच्या क्षणी स्वतःवर संयम ठेवण्यात पंत अपयशी ठरला.

जी गोष्ट पंतबद्दल तीच रविंद्र जाडेजाबद्दल. संघात अष्टपैलू म्हणून निवड झालेली असताना जाडेजाने बॉलिंगप्रमाणे बॅटींगमध्येही प्रयत्न करणं अपेक्षित आहे. परंतू १३ बॉल १३ या इनिंगमध्ये रविंद्र जाडेजानेही एकदाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यामुळे धावा जमवण्याचं दडपण हे फक्त कोहलीवर आलं.

४) विराटची बुचकळ्यात टाकणारी कॅप्टन्सी –

एखाद्या सामन्यात खराब सुरुवात झाली म्हणून खांदे न पाडता जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे ही चांगल्या कॅप्टनची निशाणी असते. परंतू दुर्दैवाने भारतीय संघाच्या बॉलिंगदरम्यान एकदाही विराट कोहलीमध्ये जोश दिसला नाही. पाकिस्तानला विजयासाठी १५२ धावांचं कमी टार्गेट असतानाही बुमराहला पहिली ओव्हर न देण्यामागचं कारण समजू शकलं नाही. संपूर्ण सामन्यात विराट आणि भारतीय खेळाडू हे थकल्यासारखे जाणवले, एकदाही भारतीय खेळाडूंनी हा सामना आपण जिंकू शकतो यासाठी प्रयत्न केले नाहीत.

दुसरीकडे बाबर आझम आणि रिझवानने पहिल्यापासून धडाकेबाज सुरुवात करत सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. याव्यतिरीक्त विराटची फिल्डींग प्लेसमेंटही सदोष वाटली. पाकिस्तानी फलंदाज ज्या भागात जास्त रन काढत होते तिकडे मोकळं मैदान विराटने तयार करुन दिलं. या रन्स रोखण्याचा प्रयत्न विराटने कॅप्टन म्हणून केला नाही.

५) सदोष संघनिवड आणि हार्दिक पांड्याचं अवघड जागेचं दुखण –

हार्दिक पांड्या बॉलिंग करणार की नाही हा आता एक राष्ट्रीय प्रश्न होऊन बसला आहे. दुर्दैवाने पाठीची शस्त्रक्रीया झाल्यानंतर हार्दिक एकदाही आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला नाही. आजच्या सामन्यातही अपेक्षा असताना हार्दिक फक्त ८ बॉलमध्ये ११ रन करु शकला. अनेकदा हार्दिकचे फटके बरोबर बसत नव्हते. आजच्या सामन्यात हार्दिकने गोलंदाजी तर केली नाहीच पण सामन्यादरम्यान त्याला मेडीकल स्कॅनसाठी बाहेर नेण्यात आलं, ज्यावरुन हार्दिक पांड्या हा पूर्णपणे फिट नाही हे स्पष्ट होतं. ही गोष्ट जर मॅनेजमेंटला माहिती होती तर त्याची संघात निवड कोणत्या आधारावर झाली याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे शार्दुल ठाकूरच्या रुपात भारताकडे पर्याय असतानाही पांड्यालाच खेळवायचा अट्टाहास टीम इंडियाला महागात पडू शकतो.

T-20 World Cup : लोकेश राहुलवर अन्याय, नो-बॉलकडे थर्ड अंपायरची डोळेझाक?

एका पराभवानंतर टीम इंडियावर टीका करणं गरजेचं आहे का असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. परंतू या स्पर्धेत भारत ज्या गटात आहे तो Group of Death म्हणून ओळखला जातोय. पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान अशा तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचा सामना आपल्याला करायचा आहे. अशावेळी स्पर्धेची सुरुवात ही नेहमी विजयानेच झालेली चांगली असते. दुर्दैवाने ही सुरुवात करण्यात भारत अपयशी ठरलाय ज्यामुळे यापुढचं गणित हे जर-तर च्या शक्यतांवर अवलंबून राहणारं आहे.

IND VS PAK T20 World Cup
2021: टीम इंडियाला प्रचंड मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात पाककडून लाजिरवाणा पराभव

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT