Lok Sabha 2024 : "मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व समजलं असतं, तर...", प्रियांका गांधींचा वार
Priyanka Gandhi On PM Modi's mangalsutra Statement : पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विधानाला प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले.
ADVERTISEMENT

Priyanka Gandhi PM Modi : 'काँग्रेसची नजर आता माता भगिनींच्या मंगळसूत्रावर आहे. त्यांना ते हिसकावून घ्यायचं आहे आणि ज्यांना जास्त मुलं आहेत. त्यांना वाटायचं आहे', या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी समाचार घेतला. मतांसाठी महिलांना घाबरवत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. (addressing a rally in Bengaluru, the Congress general secretary priyanka gandhi hit back at PM Modi's mangalsutra statement.)
"मागच्या दोन दिवसांपासून हे सुरू झालं आहे की, काँग्रेसला तुमचं मंगळसूत्र आणि सोनं हिसकावून घ्यायचं आहे. ७० वर्षांपासून हा देश स्वतंत्र आहे. ५५ वर्षे काँग्रेसचं सरकार राहिले, कुणी तुमचं सोनं हिसकावून घेतलं का? कुणी तुमचं मंगळसूत्र हिसकावून घेतलं का?", असा सवाल करत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना घेरलं.
प्रियांका गांधींनी काय म्हटलं आहे?
"जेव्हा युद्ध झालं होतं, तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतःचं सोनं देशाला दिलं होतं. माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी शहीद झालं आहे. आणि जर मोदीजींना मंगळसूत्राचं महत्त्व समजलं असतं, तर ते असे अनैतिक बोलले नसते", अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा >> मनसेच्या विरोधामुळे शिंदेंची कोंडी! दोन नावांना तीव्र विरोध
प्रियांका गांधींनी नोटबंदीच्या मुद्द्यावर बोट ठेवत मोदींना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, "शेतकऱ्यांवर कर्ज होते तेव्हा त्याची पत्नी मंगळसूत्र गहाण ठेवते. मुलांचं लग्न असो वा औषधांची गरज तेव्हा महिला आपले दागिने गहाण ठेवते. या गोष्टी या लोकांना कळत नाही. जेव्हा नोटाबंदी झाली. महिलांची बचत या लोकांनी घेतली आणि यांनी सांगितलं की, बँकेत जमा करा. तेव्हा मोदी कुठे होते. तेव्हा मोदी काय म्हणत होते? त्यावेळी तुमच्याकडून घेत होते."