T20 WC Eng Vs Nz: पराभवाची परतफेड! 2 षटकारांमुळे इंग्लंडचे स्वप्न धुळीस, न्यूझीलंड अंतिम फेरीत
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक ठरला. इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अखेरच्या काही षटकात न्युझीलंडने इंग्लंडच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिरावून घेतला. 19व्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्युझीलंडने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर न्युझीलंडने 2019 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचीही परतफेड केली. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील […]
ADVERTISEMENT
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक ठरला. इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अखेरच्या काही षटकात न्युझीलंडने इंग्लंडच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिरावून घेतला. 19व्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्युझीलंडने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर न्युझीलंडने 2019 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचीही परतफेड केली.
ADVERTISEMENT
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना न्युझीलंडने जबरदस्त प्रदर्शन केलं. 167 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडने शेवटच्या काही षटकांत सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. एकाच षटकात 23 धावांची लयलूट करत निशामने सामना न्युझीलंडच्या बाजूने फिरवला.
अखेरच्या काही षटकांत असं बदललं चित्र
हे वाचलं का?
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने न्युझीलंडला 167 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना न्युझीलंडची सुरूवात संथ झाली. एका बाजून डॅरिल मिचेलने खिंड लढवत असताना न्युझीलंडला पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागणारं असं चित्र होतं. मात्र, अखेरच्या चार षटकांत सामना फिरला.
शेवटच्या चार षटकांत न्युझीलंडला विजयासाठी 57 धावांची गरज होती. 17वं षटक सामन्यात निर्णायक ठरलं. न्युझीलंडचा फलंदाज जेम्स निशामने 17व्या षटकात तुफान फटकेबाजी करत 23 धावा वसूल केल्या. निशामने क्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीचा समाचार घेत एक षटकार आणि एक चौकारासह 23 धावा केल्या.
ADVERTISEMENT
Good morning New Zealand! #T20WorldCup pic.twitter.com/yW2G4gMaoM
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 10, 2021
18व्या षटकातही न्युझीलंडचे फलंदाज अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 18व्या षटकातही दोन षटकारांच्या मदतीने न्युझीलंडने 14 धावा केल्या. मात्र, या षटकात निशाम बाद झाला. त्यानंतर सामन्याची सूत्रं हाती डॅरिल मिचेलने 19व्या षटकांतच सामना निकाली काढला.
ADVERTISEMENT
19व्या षटकातच ‘निकाल’
न्यूझीलंडने 18 षटकांमध्ये 147 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज होती. वोक्सच्या 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर न्युझीलंडने दोन धावा काढल्या. आता न्यूझीलंडला विजयासाठी 11 चेंडूंमध्ये 18 धावांची गरजेच्या होत्या. वोक्सच्या दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरिल मिचेलने सणसणीत षटकार खेचला आणि सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मिचेलने आणखी एक षटकार लगावला आणि सामना पूर्णपणे न्यूझीलंडच्या पारड्यात गेला. अखेरच्या चेंडूवर 4 लगावत मिचेलने न्युझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘त्या’ पराभवाची न्युझीलंडकडून परतफेड
2019 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची न्युझीलंडने परतफेड केली. 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात न्युझीलंड आणि इंग्लंडे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने सामना जिंकत विश्वकप आपल्या नावे केला होता. त्यानंतर आता न्युझीलंडने इंग्लंडचा परावभ करत टी20 विश्वचषकातून घरचा रस्ता दाखवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT