AFG vs AUS : अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर समीकरण बदललं, भारतासमोर आव्हान वाढलं?

प्रशांत गोमाणे

T20 World Cup 2024 : सध्या टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4 संघांचे दोन गट आहेत. या दोन्ही गटातून दोन संघ अव्वल राहिल्यास त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. भारताशिवाय ग्रुप-1 मध्ये बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आहेत. वेस्ट इंडिज, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि गतविजेता इंग्लंड यांना गट-2 मध्ये ठेवण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ सध्या अडचणीत सापडला आहे.
t20 world cup 2024 super 8 group 1 scenarion after afaganistan win against australia team india semi final equation
social share
google news

Semi Final Equation for Group 1: टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) आज सर्वात धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. अफगाणिस्तान (Afganistan) सारख्या दुबळ्या संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा (Australia) अवघ्या 21 धावांनी पराभव केला आहे. अफगाणिस्तानच्या या ऐतिहासिक विजयानंतर सेमी फायनलची शर्यंत आणखीणच कठीण झाली आहे. तसेच गट 1 समीकरण पुर्णपणे बदलले आहे. त्यामुळे आता नेमका कोणता संघ सेमी फायनल पर्यंत पोहोचणार आहे? हे जाणून घेऊयात. (t20 world cup 2024 super 8 group 1 scenarion after afaganistan win against australia team india semi final equation) 

अफगाणिस्तानच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयामुळे सुपर 8 मधील ग्रुप-1 चे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. या गटातील चारही संघ अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. मात्र, या गटातून दोनच संघांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला हरवले असते तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले असते. पण आता अफगाणिस्तानच्या विजयामुळे बांगलादेशलाही थोडा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरी गाठायला, कोणत्या संघाला किती संधी आहे? हे जाणून घेऊयात,. 

भारत 

टीम इंडियाचे समीकरण अगदी सोपे आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास उपांत्य फेरी गाठेल. आणि जर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव झाल्यास त्याचा फारसा परिणाम होणार नाही.पण जर तो मोठ्या फरकाने नसेल तरचं. भारताचा रन रेट सध्या +2.425 आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा पराभव झाला आणि अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला तरच ते बाहेर पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान निव्वळ धावगतीच्या आधारावर भारताला मागे टाकू शकतात.

हे ही वाचा : Ramdas Kadam : 'भाजप नेत्यांचाच मोदींना पाडण्याचा कट...''

ऑस्ट्रेलिया 

अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ सध्या अडचणीत सापडला आहे. आता 24 जून रोजी सेंट लुसिया येथे होणाऱ्या सामन्यात त्याला भारताचा पराभव करावा लागणार आहे. त्याला बांगलादेशचीही मदत लागेल आणि बांगलादेशने त्यांच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करावे अशी आशा बाळगावी लागेल. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा रन रेट +0.223 आहे. भारताकडून हरल्यास बांगलादेशच्या पाठिंब्याची गरज भासेल. त्यानंतर बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवले तर तीन संघांचे प्रत्येकी दोन गुण होतील आणि नेट रनरेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp