Ramdas Kadam : 'भाजप नेत्यांचाच मोदींना पाडण्याचा कट...'' मुंबई Tak चावडीवर रामदास कदम हे काय बोलून गेले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ramdas kadam big revealation on nerendra modi mumbai tak chavadi bjp devendra fadnavis eknath shinde lok sabha result
मी सगळं शोधून काढणार, यांना (भाजपला) सोडणार नाही.
social share
google news

Ramdas Kadam, Mumbai Tak Chavadi : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मुंबई तकच्या चावडीवर अनेक खळबळजनक गौप्यस्फोट कले आहेत.यामध्ये रामदास कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना पाडण्यासाठी कट रचल्याचा खुलासा केला आहे. इतकचं नाही तर भाजपमधल्याच काही नेत्यांकडून हा कट रचण्यात आल्याचा दावा कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (ramdas kadam big revealation on nerendra modi mumbai tak chavadi bjp devendra fadnavis eknath shinde lok sabha result)

मुंबई तकच्या चावडीवर रामदास कदम लोकसभेच्या जागावाटपावर म्हणाले की, भाजपच्या जागा महिना दीड महिना आधीच जाहीर झाल्या. भाजपच्या या जागांवर कुठल्याही शिवसेनेच्या नेत्याने दावा केला नाही. पण एकनाथ शिंदेंनी जागा जाहीर करताच ही जागा आमची, ती जागा आमची आहे, असा भाजपकडून दावा करण्यात आला. सर्व्हेचाही दाखला आम्हाला दिला. पण आता मी या सर्व्हेचा तपास करणार आहे. हा सर्व्हे कोणी केला? भाजपच्या जिथे जागा पडल्या तिकडे सर्व्हे झाला होता की नाही? मी सगळं शोधून काढणार, यांना (भाजपला) सोडणार नाही असे रामदास कदम यांनी स्पष्ट सांगितले आहे. 

हे ही वाचा : NEET Latur : 'नीट पेपर'फुटीचे लातूरपर्यंत कनेक्शन, दोन शिक्षकांना ATS ने घेतले ताब्यात

रामदास कदम पुढे म्हणाले, भाजपने कल्याण, ठाणे, पुणे, रायगड,रत्नागिरी, नाशिक आमचचं आहे, असा दावा केल्यामुळे आमच्या 4-5 जागा कमी झाल्या. खरं तर भाजपची जबाबदारी होती एकेक खासदार कसा वाढेल आणि मोदींना मदत कशी मिळेल. मग मोदींना पाडण्याचं कटकारस्थान होतं का? भाजपच्याच काही लोकांकडून हे रचलं गेलं होतं का? असंही मी म्हणू शकतो. पण मी हे भाषणात बोललो नाही, असे रामदास कदम यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवायचं, 400 च्या पार जाण्याची रणनीती होती. मग तुम्ही एकनात शिंदेंच्या जागा आणि तुमच्या जागा एकाचवेळी का जाहीर केल्या नाहीत? एकनाथ शिंदेंनी जागा जाहीर केल्यानंतर ही जागा आमचीच आहे, श्रीकांत शिंदे हे दोन वेळ खासदार राहिलेले आहेत, ती जागा तुम्ही मागता. ती शिवसेनेची जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. एकनाथ शिंदेंची जागा ही देवेंद्र फडणवीस जाहीर करतात, मग यामागचा हेतू काय? कशासाठी? मग तुम्हाला मोदींना पंतप्रधान बनवायचं नव्हतं का? असा भाजपच्या काही नेत्यांचा हेतू होता का? असा सवाल रामदास कदमांनी यावेळी उपस्थित केला. 

दरम्यान जर या गोष्टी झाल्या नसत्या तर हेमंत पाटील 100 टक्के निवडून आले असते. आणि शिवसेनेच्या 5 जागा म्हणजेच महायुतीच्या 5 जागा वाढल्या असत्या, असा दावा देखील रामदास कदम यांनी केला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Pune Accident : आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले, एकाचा जागी मृत्यू

    follow whatsapp

    ADVERTISEMENT