बीडमधल्या शेतकऱ्याच्या मुलाचा सातासमुद्रापार डंका! अमेरिकेत अभिमानास्पद कामगिरी
रोहित हातागळे, प्रतिनिधी, बीड बीड जिल्ह्यातील प्रतिभावान धावपटू अविनाश साबळेने ५ हजार मीटर शर्यतीत बहादूर प्रसादचा ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये अविनाशने १३ : २५.६५ वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. साबळे यांनी येथे १२ वा क्रमांक पटकवला. बीडच्या अविनाश साबळेने […]
ADVERTISEMENT
रोहित हातागळे, प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील प्रतिभावान धावपटू अविनाश साबळेने ५ हजार मीटर शर्यतीत बहादूर प्रसादचा ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये अविनाशने १३ : २५.६५ वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. साबळे यांनी येथे १२ वा क्रमांक पटकवला. बीडच्या अविनाश साबळेने याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता . पण त्याला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यश आले नव्हते. अविनाश साबळे हा बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा सुपुत्र आहे .
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अविनाश साबळे देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्वल करतोय . अगदी प्राथमिक शिक्षणासाठी त्याला घरापासून पाच ते सहा किलोमीटर दूर असलेल्या शाळेत जावे लागायचे . आई वैशाली साबळे आणि वडील मुकुंद साबळे हे शेतकरी असल्याने त्यांना शेतात लागेल त्या कामात मदत करणेही ओघाने आलेच . शेतीतील उत्पन्नात घर चालवण्यासाठी वडिलांना करावी लागणारी कसरत अविनाशने जाणली होती . ही परिस्थिती बदलण्यासाठी त्याने खेळातच करिअर करण्याचे निश्चित केले.
ADVERTISEMENT
अविनाशमध्ये असलेल्या उपजत प्रतिभेमुळे सहावीच्या वर्गात असतानाच क्रीडा प्रबोधिनीच्या चाचणीत उत्तीर्ण झाला . त्याला औरंगाबाद येथील प्रबोधिनीत प्रवेश मिळाला . तेथून पुढील चार वर्षाचे शिक्षण त्याच ठिकाणी झाले . परंतु दहावीनंतर चांगले प्रदर्शन करु न शकल्याने त्याच्यावर प्रबोधिनी सोडण्याची वेळ आली होती.अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये अविनाशने १३ : २५.६५ वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला असून १२ वा क्रमांक मिळवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT