रवि शास्त्रीनंतर प्रशिक्षकपदी पुन्हा अनिल कुंबळे?; बीसीसीआयच्या हालचाली सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पुन्हा एकदा अनिल कुंबळेकडे जाण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव बीसीसीआयच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. कर्णधार विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर अनिल कुंबळेनं प्रक्षिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.

ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. टी-२० विश्व चषक स्पर्धेनंतर तिघांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपणार असून, बीसीसीआयने प्रशिक्षणपदासाठीच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

टी-२० विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी अनिल कुंबळेवर सोपवण्यास बीसीसीआय अनुकूल आहे. मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यासंदर्भात बीसीसीआयकडून अनिल कुंबळेला सांगितलं जाऊ शकतं. अनिल कुंबळेकडून बीसीसीआयला होकार मिळाला तर त्याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते, अशी माहिती आहे.

हे वाचलं का?

Virat-Rohit मधला अंतर्गत वाद कॅप्टन्सी सोडण्यासाठी कारणीभूत? कोहलीच्या ‘त्या’ मागणीवर BCCI नाराज

2016-17 मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी अनिल कुंबळेकडे होती. एक वर्ष काम केल्यानंतर अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने रवि शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती.

ADVERTISEMENT

‘या’ 6 कारणांमुळे विराट कोहलीला टी-20 चं कर्णधारपद सोडावं लागलं?

ADVERTISEMENT

कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये मतभेद झाले होते. त्याच्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर कुंबळेने राजीनामा दिला होता. याविषयी पीटीआयशी बोलताना सूत्रांनी सांगितलं की, ‘अनिल कुंबळे राजीनामा प्रकरणात सुधारणा होणं आवश्यक आहे. ज्यापद्धतीने कोहलीच्या दबावाखाली येऊन कुंबळेला हटवण्यात आलं, ते चांगलं उदाहरण नव्हतं. आता अनिल कुंबळे वा व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास तयार होणार का? यावर सगळं अवलंबून आहे’, असं सूत्रांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT