Thomas Cup Badminton : थॉमस कप स्पर्धेत भारताने घडवला इतिहास; सुवर्ण यशापासून एक पाऊल दूर
भारतीय पुरुष बॅटमिंटन संघाने इतिहास घडवला. भारतीय बॅटमिंटन टीम पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडकली. ७३ वर्षांपासून खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. सुवर्ण पदकापासून भारत एक पाऊल दूर असून, रौप्य पदक निश्चित झालं आहे. थॉमस कप बॅटमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने शुक्रवारी २०१६ चा स्पर्धेचा विजेता डेन्मार्कचा ३-२ ने […]
ADVERTISEMENT

भारतीय पुरुष बॅटमिंटन संघाने इतिहास घडवला. भारतीय बॅटमिंटन टीम पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडकली. ७३ वर्षांपासून खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. सुवर्ण पदकापासून भारत एक पाऊल दूर असून, रौप्य पदक निश्चित झालं आहे.
थॉमस कप बॅटमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने शुक्रवारी २०१६ चा स्पर्धेचा विजेता डेन्मार्कचा ३-२ ने पराभव केला. आता अंतिम सामना रविवारी (१५ मे) भारत आणि इंडोनेशिया यांच्यात होणार आहे.
जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या प्रणयने घसरून पडल्यानंतरही विजय मिळवला. मेडिकल टाइमआउट घेतल्यानंतर प्रणयने १३-२१, २१-९, २१-१२ अशा फरकाने विजय मिळवला.
डेन्मार्कविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक विजेता लक्ष्य सेन चांगला खेळ करू शकला नाही. त्यामुळे डेन्मार्कने आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी विजय मिळवत १-१ अशी बरोबरी साधली.