VIDEO: आरारारारा खतरनाक... एकाच मॅचमध्येच 3 सुपर ओव्हर, वाचताय तेच खरंय!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Three Super Over Viral Video
Three Super Over Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकाच सामन्यात रंगला तीन सुपर ओव्हरचा थरार

point

सुपर ओव्हरचा व्हिडीओ पाहून थक्कच व्हाल

point

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं...

Three Super Over Match Viral Video : महाराजा टी-२० ट्रॉफीचा २३ ऑगस्टला झालेल्या क्रिकेट सामन्यात जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. हुबली टायगर्सने तीन सुपर ओव्हर्सनंतर या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. हुबली टायगर्सने प्रथम फलंदाजी करत १६४ धावा केल्या. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरु ब्लास्टर्सनेही प्रतिस्पर्धी संघा विरुद्ध १६४ धावा करून जशास तसं उत्तर दिलं. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर टाकण्यात आल्या. एकाच सामन्यात तीनवेळा सुपर ओव्हर झाल्याचं क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळालं. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या या थरारक सामन्यात हुबली टायगर्सने महाराजा टी-२० ट्रॉफीत ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये तीन सुपर ओव्हरचा थरार रंगला. (The Maharaja T20 Trophy cricket match on 23rd August saw tremendous excitement. Hubli Tigers won the match in a thrilling manner after three super overs)

पहिली सुपर ओव्हर

बंगलुरु ब्लास्टर्सचा कर्णधार मयंक अग्रवाल पहिल्या चेंडूवर बाद झाला. पण अनिरुद्ध जोशीच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानं संघाने वापसी करत १० धावा केल्या. मनिष पांडेने ८ धावांची गरज असतना मोठा फटका मारला. पण जेव्हा एका चेंडूवर २ धावसंख्येची गरज होती, त्यावेळी गोलंदाज कौशलने पांडेला झेलबाद केलं. त्यानंतर टायगर्सच्या संघानं १ धाव काढून सुपर ओव्हरच्या धावसंख्येची बरोबरी केली.

दुसरी सुपर ओव्हर

मनवंत कुमारसोबत मनिष पांडे सलामीला उतरला. परंतु, या जोडीला (८ धावा) स्वस्तात माघारी पाठवायला प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना यश आलं. त्यानंतर वेगवान गोलंदाज विद्वत कवेरप्पानं त्याच्या संघासाठी भेदक गोलंदाजी केली. सुरुवातीला एक चौकार देण्याऐवजी त्याने फक्त चार धावा अतिरिक्त दिल्या. त्यामुळे सामना सुपर तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तिसरी सुपर ओव्हर

बंगळुरु ब्लास्टर्सने तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी केली. शुभांग हेगडे आणि अनिरुद्ध जोशी यांनी सलामीला फलंदाजी केली. परंतु, मनवंतने पहिल्याच चेंडूवर अनिरुद्धला बाद केलं. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर शुभांग हेगडेने बॅकवर्ड पॉइंटला षटकार ठोकला आणि या संघाची धावसंख्या १२ धावांवर पोहोचली.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या टायगर्स संघासाठी मनवंत कुमार आणि कर्णधार मनिष पांडे सलामीला उतरले. क्रांती कुमार गोलंदाजी करत होता. त्यांनी दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून खेळ पुढे सुरु ठेवला. पण क्रांतीने जोरदार वापसी केली आणि पुढच्या तीन चेंडूवर फक्त तीन धावा दिल्या. त्यामुळे टायगर्सच्या संघला शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती आणि मनवंतने चौकार मारून सामना जिंकला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT