Tokyo Olympics 2020 : ‘सर्वजण क्रिकेटला पाठींबा देत असताना त्यांनी हॉकीची निवड केली’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीवर मात करुन कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघावर सध्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कर्णधार मनप्रीत सिंग आणि कोच ग्रॅहम रिड यांच्याशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.

ADVERTISEMENT

संपूर्ण देश कौतुक करत असताना भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतने आपल्या ट्विटर हँडलवरुन ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे खास आभार मानले आहेत.

ओडीशा सरकार हे भारतीय हॉकी संघाचे प्रमुख स्पॉन्सर आहेत. जेव्हा सर्वजण क्रिकेटला पाठींबा देत असताना पटनाईक यांनी हॉकीची निवड करत आम्हाला पाठींबा दिला आणि त्याचा परिणाम आज आपण पाहत आहोत असं म्हणत मनप्रीतने पटनाईक यांचे आभार मानले आहेत.

हे वाचलं का?

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही भारतीय संघाचं हे पदक क्रिकेट वर्ल्डकपच्या विजयांपेक्षा मोठं असल्याचं म्हटलं आहे.

Tokyo Olympics 2020 : हॉकीमधलं हे मेडल क्रिकेट वर्ल्डकपपेक्षा मोठं – गौतम गंभीर

ADVERTISEMENT

SAHARA सोबतचा करार संपल्यानंतर भारतीय हॉकी संघाला स्पॉन्सरशीप देण्यासाठी ओडीशा सरकार त्यावेळेला पुढे आलं. २०१८ मध्ये ओडीशा सरकारने हॉकी इंडियासोहत ५ वर्षांचा करार केला. ज्यात ज्युनिअर, सिनीअर, पुरुष व महिला हॉकी संघासाठी १५० कोटींचा करार झाला. २०२३ पर्यंत हा करार कायम राहणार आहे. आर्थिक मदतीसोबतच ओडीशा सरकारने गेल्या काही वर्षांत भुवनेश्वर आणि महत्वाच्या शहरांत खेळाडूंना जागतिक दर्जाचं ट्रेनिंग सेंटर, रिहॅब फॅसेलिटी, प्रॅक्टिस पीच अशा अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. याचसाठी भारतीय हॉकीच्या या विजयात ओडीशा सरकारचा महत्वाचा वाटा मानला जात आहे.

ADVERTISEMENT

२०१३ पासून ओडीशा सरकारने हॉकीत आपला रस दाखवण्यास सुरुवात केली आहे. २०१३ मध्ये हॉकी इंडिया लिगमध्ये ओडीशातील दोन व्यवसायिकांनी कलिंगा लान्सर्स हा संघ विकत घेतला होता. २०१४ साली ओडीशात चॅम्पिअन्स ट्रॉफी, २०१७ साली हॉकी वर्ल्ड लिग, २०१८ साली हॉकी विश्वचषकही ओडीशात आयोजित करण्यात आला होता. यानंतर २०२३ हॉकी विश्वचषकाचं आयोजनही ओडीशातच करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये ‘फिनीक्स’भरारी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT