Tokyo Olympics मधे सुवर्ण पदक जिंकलेल्या नीरज चोप्राला फणफणून ताप, कोरोनाची टेस्टही झाली…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये भाला फेक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राची तब्बेत बिघडली आहे. त्याला फणफणून ताप भरला आहे. त्याचा घसाही सुजला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नीरज चोप्राची कोव्हिड चाचणीही करण्यात आली. मात्र ती चाचणी निगेटिव्ह आली आहे. ANI ला नीरज चोप्राच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नीरज चोप्रा याला चांगलाच ताप भरला आहे. तसंच त्याचा घसाही सुजला आहे. तापामुळे त्याची प्रकृती बिघडली आहे अशी ही माहिती आहे.

नीरज चोप्राला चांगलाच ताप भरला आहे, त्याचा घसा सुजला आहे. तसंच ताप काही कमी होण्याचं नाव घेत नाही. मात्र सुदैवाने त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे. मागच्याच शनिवारी नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवला. भाला फेक स्पर्धेत त्याने सुवर्ण कामगिरी केली. त्यामुळे त्याचा जगभरात गौरव झाला. याच नीरज चोप्राला आता फणफणून ताप भरला आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने गोल्ड मेडलची कमाई करत संपूर्ण देशवासियांना आनंदाचे क्षण दिले. तब्बल १३ वर्षांनी भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. नीरज चोप्राचा सुवर्णपदकापर्यंतचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. कठोर मेहनत, परिश्रम आणि सरावाच्या जोरावर नीरज चोप्राने इथपर्यंत बाजी मारली. मध्यंतरीच्या काळात नीरज चोप्राला दुखापतींनाही सामोरं जावं लागलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भाला फेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकून भारताच्या नीरज चोप्राने इतिहास घडवला. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या स्पर्धेसाठी उतरलो तेव्हा माझ्या डोक्यात वेगळं काहीतरी करू असा विचार होता पण गोल्ड मेडल जिंकण्याचा विचार नव्हता असं म्हणत नीरज चोप्राने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या शिरपेचात सुवर्णतुरा खोवणाऱ्या नीरजने ही प्रतिक्रिया दिली आहे. 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर 13 वर्षांनी आलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT