Tokyo Olympic 2020 : दिपीका कुमारीच्या रुपाने तिरंदाजीत भारताचं आव्हान कायम

मुंबई तक

तरुणदीप रॉय, प्रवीण जाधव यांचं आव्हान संपुष्टात आलेलं असताना दिपीका कुमारीच्या रुपात भारताला तिरंदाजीत पदकाची आशा अजुनही कायम आहे. आज झालेल्या लढतीत दिपीकाने अटीतटीच्या सामन्यात अमेरिकेच्या खेळाडूला ६-४ ने पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. दिपीकाचा उप-उपांत्यपूर्व फेरीचा सामना शुक्रवारी रंगणार आहे. दिपीकाच्या तुलनेत अमेरिकेची खेळाडू जेनिफर फर्नांडीस ही वयाने लहान आहे. परंतू प्रत्यक्ष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

तरुणदीप रॉय, प्रवीण जाधव यांचं आव्हान संपुष्टात आलेलं असताना दिपीका कुमारीच्या रुपात भारताला तिरंदाजीत पदकाची आशा अजुनही कायम आहे. आज झालेल्या लढतीत दिपीकाने अटीतटीच्या सामन्यात अमेरिकेच्या खेळाडूला ६-४ ने पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. दिपीकाचा उप-उपांत्यपूर्व फेरीचा सामना शुक्रवारी रंगणार आहे.

दिपीकाच्या तुलनेत अमेरिकेची खेळाडू जेनिफर फर्नांडीस ही वयाने लहान आहे. परंतू प्रत्यक्ष मैदानात जेनिफरने दिपीकाला चांगलंच झुंजवलं. दिपीकाचा सामना सुरु असताना मैदानात हवा होती, ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तिला ७ गुणांवर समाधान मानावं लागलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात दिपीकाने ९-९ गुणांची कमाई करत चांगलं पुनरागमन केलं. परंतू जेनिफरने पहिला सेट खिशात घालत आघाडी घेतली.

Tokyo Olympic 2020 : मराठमोळ्या प्रवीण जाधवचा पदकावरचा नेम चुकला, आव्हान संपुष्टात

दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये दिपीका कुमारीने आपल्या अनुभवाचा फायदा घेत आश्वासक कमबॅक करत सामन्यांत आघाडी घेतली. २० वर्षी जेनिफरने या सेटमध्ये काही चुका करत दिपीकाला हातात संधी दिली. परंतू चौथ्या सेटमध्ये अमेरिकेच्या जेनिफरने पुन्हा एकदा सामन्याचं चित्र पालटलं.२५-२४ च्या फरकाने चौथा सेट जिंकत जेनिफरने सामन्यात ४-४ अशी बरोबरी केली.

हे वाचलं का?